तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,
हे तर माझं फक्त एक काव्य आहे....
खर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला,
मरणानंतरही जगायचं आहे...


ही चारोळी नाही
माझ्या आयष्याची होळी आहे...,
फक्त एकवेळ समजून घे मला
भले नंतर माझं नशीब माझ्यावर रुसावं....

मनातल्या भावना परखडपणे,
मी सुध्दा चारोळीतून व्यक्त करतो.
पहिल्या दोन ओळी पटकन होतात,
उरलेल्या दोघींसाठी खटाटोप पुरतो.
अमोल भारंबे (२००८).

Type rest of post here

नाही कळले प्रेम तुला,
मी शब्दांतून मांडलेले.
भावनांचे ते विलक्षण मोती,
माझ्या हृदयातून सांडलेले.
अमोल भारंबे (२००८).

बंद घरात बंद तो चिमणा,काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता...
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता.

'आज तुझ्या आठवणीत

आयुष्यातला

एक-एक क्षण...

मी विसरत आहे!

विसरते क्षण...

पसरत्या आठवणी...

सारं काही

तुझंच आहे!...तुझंच आहे



एकच अपेक्षा,
माझ्या ह्रदयातील शब्दांना तू पुसावं...,
फक्त एकवेळ समजून घे मला
भले नंतर माझं नशीब माझ्यावर रुसावं....

रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!


रंग त्याचा होऊनी अन्‌

उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरे...स्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?'

काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये
@ सनिल पांगे

कॉलेज लाइफ़

कँटीन मधला चहा आणि

चहा सोबत वडा पाव

पैसे कुठ्ले खिशात तेव्हा

उधारीचचं खातं राव !


कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून

आणि पोरींची चेष्टा करणं

दिसलीच एखादी चांगली तर

तिला लांबूनच बघून झुरणं !


बसलोच चुकून लेक्चरला तर

शेवटचा बाक ठरलेला

कुणाच्या तरी वहीतलं पानं

आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली

कि मात्र रात्री जागायच्या

डोळ्यात स्वप्नं उद्याची

म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !


पूर्ण व्हायचं एक वर्तुळ

एक वर्ष सरायचं

पुन्हा नव्या पाखरांसोबत

जुनं झाड भरायचं.


अशी वर्तुळ भरता भरता कळलं

अरे कागदच भरला !

वर्तुळ झाल्या कागदाला

फ़क्त सलाम करायचा उरला !!

मनाच्या गच्चीवर,

भावनांचे पतंग...

वारंवार झुगारतात,

सावरण्याचे प्रसंग.

चार ओळीत आयुष्य मांडतांना
मी तीन ओळीतच घुटमळत होतो...,
चौथी ओळ सांगतांना
मी उगाचच स्वतःपासून दूर पळत होतो....

मला नाही जमत
तुझ्यासारखं वागायला...,
सागरा इतकं हसून
आभाळासारखं रडायला....

'रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!

रंग त्याचा होऊनी अन्‌
उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरे...स्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?'

दुःखाच्या क्षणांतही सुखाचे कण वेचता,
आनंदाने भरति अनंत लोकी झोळ्या.
पाठीशी हात जेव्हा ज्ञानदेवी ती सरस्वती,
अक्षरांची होती फुले अगणित चारोळ्या.
अमोल भारंबे (२००८).

'असीम-जीवन पथ चालताना-

तुझे पाय थकणार नाहीत का?


माझा सगळा आनंद...उत्साह घे;


मला तुझ्या साऱ्या जखमा...दु:ख दे।


---मी तर तुझी सावलीच आहे रे,


चालण्याची शक्ती तुलाच हवी आहे


अमर

आज शांत एकांती

येति आज शांत एकांती

येति तिच्या आठवणी

आठवते सारे...सारे

गुणगुणले होते कुणी...


गुणगुणले होते कुणी----
मुग्ध कळी उमलली

उमलली तुझ्याचसाठी;

तुझ्याचसाठी वेडी कुणी!

तुझ्याचसाठी वेडी कुणी,

तुझ्या कळते नकळत;

कळते न तुला वेड्या,

गाते ती रे प्रेमगाणी!

प्रेमगाणी विरली अन्‌

अन्‌ आर्त सूर आता

उरलेले रेंगाळती---

आज शांत एकांती...

आठवते सारे...सारे

गुणगुणले होते कुणी...


गुणगुणले होते कुणी----

मुग्ध कळी उमलली

मुग्ध कळी उमलली

तुझ्याचसाठी वेडी कुणी!

तुझ्याचसाठी वेडी कुणी,

तुझ्या कळते नकळत;

कळते न तुला वेड्या,

गाते ती रे प्रेमगाणी!


प्रेमगाणी विरली अन्‌

अन्‌ आर्त सूर आता

उरलेले रेंगाळती---

आज शांत एकांती...


अमर

आठवतेय मला, ती आपली पहिली भेट,
तुझं हूं-हूं... फक्त हूं-हूंच म्हणणं..,
आणि धडधडत्या काळाजाच्या तालावर
’तुझा आवाज गोड आहे’, असं मी गुणगुणनं.

जीवन-मरणाच्या सीमेवर

माझं जीवन उभं आहे!

सीमा-रेषेवरुन आता

मृत्यूची हाक येते आहे!

मृत्यूच्या दारी मी

शेवटची इच्छा घेऊन उभा आहे!

पूर्ण करणारा आहे का कोणी

याची प्रतिक्षा करतो आहे!

तिच्या खिडकीसमोर बांधा

माझी कबर!

उगवतील गुलाब... सदाबहार!

त्यांच्या दर्शनानं तरी

तिच्या चित्तवृत्ती फुलतील!

कमलाकर (घाईघाईने) : साहेब ! अहो साहेब ! कॄपया माझी तक्रार लिहून घ्या. माझी बायको हरवली आहे.

साहेब : अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे पोलीस स्टेशन नाहीये. हे पोस्ट ऑफिस आहे.

कमलाकर : अस्स होय ! काय आहे, आनंदाच्या भरात मला काही सुचतच नाहीये ! कुणाला सांगू अन कुणाला नाही ?

जीवन-मरणाच्या सीमेवर

माझं जीवन उभं आहे!

सीमा-रेषेवरुन आता

मृत्यूची हाक येते आहे!

मृत्यूच्या दारी मी

शेवटची इच्छा घेऊन उभा आहे!

पूर्ण करणारा आहे का कोणी

याची प्रतिक्षा करतो आहे!

तिच्या खिडकीसमोर बांधा

माझी कबर!

उगवतील गुलाब... सदाबहार!

त्यांच्या दर्शनानं तरी

तिच्या चित्तवृत्ती फुलतील



Type rest of post here

माझ्या प्रतिक्षेचा अंत
त्या क्षितिजाच्या टोकावर होता...,
चातकाचा प्राण गेला तेव्हा
पाऊस तोंडावर होता....

जगण्या मरण्याच्या कसल्या गोष्टी करतोस रे,
प्रेमात पडला आहेस ना रे तू.
कशाला हवय असलं हे वजनी बोलणं,
नवकळी सारखा फुलून ये की तू.
© अमोल भारंबे (२००८)


जन्म नाही मृत्यु ही नाही

हाती आपल्या काही नाही

तरी ही खेळ चालुच आसतो ना ?

हा माझा , तो तुझा

हा विश्वासु , तो बनेल

अंदाज आपलेच आपल्याच मानत सुरु आसतात ना ?
विचारांना सीमा नसते....

तरी जगणे हे सीमीत असते

प्रकाश्यातुंन चालताना ही

डोळ्यासमोर आंधली येते

कारण बुद्धि आपली भ्रमित आसते

म्हणतात जीवन हे सुन्दर असते......

का मग दुखच त्यात भरमसाठ भेटते

कदाचित काही प्रश्नान उत्तरे नसतात

15.GhanshamSundara : डाउनलोड करा

14.EkLajranSajraMukhada : डाउनलोड करा

13.DisJatilDisYetil : डाउनलोड करा


11.DevDewharyatNhahi : डाउनलोड करा


8.DaulMorachyaManacha : डाउनलोड करा

7.ChandraAhenSakahila : डाउनलोड करा

6.ChandraAaheShakshila : डाउनलोड करा


5.AsahaBebhanVara : डाउनलोड करा

1.AakashiZhepGherePankhara : डाउनलोड करा

तू दीलेल्या जख्मा
आठवण तुझीच करतात
पेग्वर पेग केले रीते
बर झाल तू गेलीस ते

अनंत आमच्या चारोळ्या,
अन् त्यांचे अनंत हे अंगण.
शब्द-वाक्ये इथे एकत्र नांदतात,
दाद तुमची जणू प्रेमाचे वंगण.
अमोल भारंबे (२००८).

’आय लव्ह यू!’

’आय लव्ह यू!’

--- डोळ्या-डोळ्यांच्या भाषेतलं

प्रेमगीत संपलं,

अन्‌

गरगरणारे मेंदू...

बेभा$न मनं...सुन्न।

दाही दिशा कवळणारी मिठी...

कोणाच्या ओठात कोणाचे,

न कळणारे ओठ...

अर्धोन्मीलित नेत्र...

धडधडणारी ह्रुदयं...

बाकी सगळं शांत...

सगळं शां$त!

समजून कुणी घेत नाही,
सर्वजण फक्त मला समजवतात...,
ते ढग या चातकाला ’हट्टी’ म्हणवून
एका-एका थेंबासाठी तरसवतात...

एक शब्द!

नवीन

तरल...हळुवार...

अन्‌

बोलण्याआधीच

ती थबकली!

तिच्या भावदर्शी नेत्रांनी

म्हणे

आधीच फितुरी केली होती!

एकटे पणाचे दु:ख तुला नाही कळणार!!

हेच नेहमी सांगुन तु मला पिळणार?


तुझ्या विना मी एकटा, तुला कधी कळणार?

एकट्यावर प्रेम करायला तु कधी शिकणार?


वाट तुझी पहायची किती, कधी मला कळणार?

आयुष्य असे जगुन मी एकटाच किती झुरणार?



Type rest of post here

याच्या त्याच्या नात्याची
प्रत्येकालाच उत्सुकता असते...,
पण खरं पाहता
स्वच्छ मनाला नात्याची गरजच नसते....

तुला उमगतं ना सारं...

बघ ना मी किती वेडा आहे

तुझा दिवस भेटुनही वाटतो थोडा आहे,

माझे असे नेहमीचेच वागणे

सांग ना मी खरचं वेडा आहे?

हा भेद तु खोलणार नाहीस

तु बोलणार नाही ठाऊक आहे
हा माझ्यातला बदल समझायचा की?

मी खरचं भावुक आहे।

प्रत्येक क्षण तुला द्यावासा वाटतो

तुझा हात हाती घ्यावासा वाटतो,

तुला समझतयं ना मी काय म्हणतोय

माझ्यातला मी,तुझाच व्हावासा वाटतो!

सांग ना ,तुला समझत ना सारं?

मी वेडा नाही ना?

तुला उमगत ना सारं?

तुला विसरून जायच अनेकदा होत ठरवल
सरून गेले काही दिवस की पुन्हा आठवत
तुला विसरायच होत कधी ठरवल
अन मग आठवत जातो किती तुला मनात भरवल

तुझ्या प्रेमाच्या सरीतेत,
मी अखंड पोहत होतो,
अचानक तु रुक्ष झालीस अशी,
की एकटाच वाळुत तडफत होतो !
...... A j i t

माणूस हा तर,
मुळातच समाजशील प्राणी आहे.
प्रत्येक माणसाच्या हृदयाला,
हर एक नात्याची आस आहे.
© अमोल भारंबे (२००८).

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,

गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....

गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,

तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....


अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,

चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....

आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,

चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!

तुझे ते हास्य

सार काही विसरायला लावते

आणि तुला हे सांगायच

तर मन घाबरायला लागते

■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■