गेल्या वर्षभरापासून शैलेशच्या कामाचा व्याप वाढला होता. बारा-बारा तास अॉफिस, मुंबई-दिल्ली- बेंगळुरू दौरे, बॉसबरोबर मीटिंग्ज या साऱ्यात त्याला त्याचा सवर्वांत आवडता - वाचनाचा छंद जोपासायला वेळच मिळत नव्हता. दौऱ्यावर जाताना सोबत पुस्तकांचं ओझं नेणं नकोसं होते. त्यामुळे प्रवासात किंवा रात्री झोपतानाही वाचन होत नाही. वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला बरेच दिवस वाचायला काही मिळालं नाही की ती सैरभैर होते. अशा व्यक्तींसाठी बुक्स इन माय फोन ही सेवा उपयोगी ठरू शकते.

फेसबुक, ट्विटर यांच्या मोबाईल एडिशन्स वेगाने लोकप्रिय होत असतानाच आता गुगलने मोबाईलच्या वापराला एक नवी दिशा प्राप्त करून दिली आहे. गुगलने ‘मॅप्स’ प्रोजेक्ट अंतर्गत ‘लॅटिट्यूड’ या नव्या प्रॉडक्टची आज घोषणा केली. पुण्यात जंगली महाराज रोडवर फिरताना माझ्या एका मित्राने त्याच्या क्लाएंटला तो सोलापूर रोडवर टॅफिक जॅममध्ये अडकल्याचे सांगितल्याचे मला आठवतेय. पण 'गुगल लॅटिट्यूड'वरून तुम्ही तुमच्या मित्रांची अशी फसवणूक नक्कीच करू शकणार नाही. तुमच्या मोबाईलच्या लोकेशनवरून तुम्ही नेमके कुठे आहात, हे आता तुमच्या जी-टॉकवरील मित्रांना कळू शकणार आहे!

यूट्यूबवर आजकाल अनेक टीव्ही सिरियल्स आणि मूव्हीज अपलोड केल्या जातात. अमेरिकन, ब्रिटीश आणि भारतीय प्रॉडक्शन हाऊसेस याकडे एक प्रमाोशनल अॅक्टीव्हिटी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे फॉक्स सर्चलाईट, कोलंबिया पिक्चर्स आदींचे स्वतंत्र यूट्यूब चॅनेल्सही आहेत. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, फॉक्स हिस्टरी आदी चॅनेल्सवरील गाजलेल्या सिरीजही तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. पण यूट्यूबवर पाहायचं म्हणजे तुम्हाला अॉनलाईन राहावं लागतं. शिवाय तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर ‘लो’ किंवा असेल त्या रिझॉल्यूशनमध्ये संबंधित व्हिडीओ पाहायला लागतात. हे व्हिडीओ हाय-डेफिनिशनमध्ये उपलब्ध असल्यास तुम्ही ते आहे तसे डाऊनलोड करून थेट टीव्हीवर पाहू शकतायूट्यूबवरील व्हिडीओ एचडी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही यूट्यूब डाऊनलोडर एचडी या सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. विंडोज अॉपरेटिंग िसस्टिम (95/98/Me/2000/XP/2003/Vista) वर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येऊ शकते. यूट्यूबवर एचडी फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिडीओची लिंक तुम्ही यूट्यूब डाऊनलोडर एचडीमध्ये पेस्ट केली की संबंधित व्हिडीओ एफएलव्ही, एव्हीआय, एमपी४ (आयपॉड कम्पॅटिबल) किंवा एव्हीआय एचडी फॉरमॅटमध्ये सेव्ह करून घेऊ शकता.यूट्यूब डाऊनलोडर एचडी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
यूट्यूबवरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठीच्या आणखी एका सेवेची माहिती वाचाः झटपट डाऊनलोड

गुगल.कॉमवर आपण बर्‍याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर अनेक (हजारो) वेबसाईटची यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो. मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो.कधीकधी गुगल.कॉमचा हाच स्वभाव अनेकांना आवडत नाही. विचारलेल्या माहितीची असंख्य पाने दाखविल्यावर त्यांना राग येतो. यावेळी गुगल.कॉमला नावे ठेवण्यापेक्षा आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो.
गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो.
१. आपल्या प्रश्नामध्ये ‘ + ‘ चिन्हाचा वापर करावा : समजा गुगल.कॉमवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (म्हणजेच मोबाईलचा इतिहास) शोधायचे असल्यास गुगल.कॉम ‘ Mobile + History ‘ असे सर्च केल्यास गुगल.कॉम हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
२. आपल्या प्रश्नामध्ये ‘ - ‘ चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगल.कॉमवर ’sachin’ असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये ’sachin tendukar’ च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगल.कॉमला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर ’sachin -tendukar’ असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल.कॉम येणार्‍या उत्तरामध्ये ‘tendukar” हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
३. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ~ ‘ चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखिल गुगल.कॉम दाखवितो.
४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीह एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगल.कॉमवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल.कॉम फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ‘ site:www.abc.com mobile ‘ असे दिल्यास गुगल.कॉम फक्त www.abc.com वर mobile हा शब्द शोधेल.
५. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचे असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल.कॉम त्या शब्दाच्या आधी ‘ define: ‘ असे दिल्यास गुगल.कॉम त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ‘ define:Computer ‘ असे शोधल्यास गुगल.कॉम ‘ Computer ‘ या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.
६. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमूळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का? ते शोधण्यासाठी ‘ related: ‘ या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ‘ related:http://www.xyz.com/ ‘ असे शोधल्यास गुगल.कॉम ‘ www.xyz.com ‘ प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची यादी देईल.
७. जसाच्यातसा शब्ध शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगल.कॉमवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच ” ” याचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर “contact us” असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एखत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
८. आपल्या प्रश्नामध्ये ‘ * ‘ चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पुर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधीत इतरही शब्द सापडल्यास ती देखिल दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ‘ * ‘ चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर ‘ friend* ‘ असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends , friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखिल उत्तरामध्ये विचार करतो.
९. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ? ‘ चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ? ‘ चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘ fri??d ‘ असे सर्च केल्यास गुगल.कॉम त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्यती अक्षरे घेवून त्या माहितीची पाने दाखवितो.
१०. आपल्या प्रश्नामध्ये ‘ AND अथवा OR ‘ शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस जर आपणास दोन शब्दाना मिळून एकत्रिच सर्च करायचे असते त्या वेळी ‘ AND अथवा OR ‘ शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल.कॉम मध्ये सर्च करताना ‘ Mobile or Books ‘ सर्च केल्यास गुगल.कॉम ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ‘ AND ‘ शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.