पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...

मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर होईल जीवन अळणी

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं,
थेट जाउन बोलण्या पेक्शा इझी आणि बेटर असतं,
गोड गुलाबी थंडीतल गुलाबी स्वेटर असतं,
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनातल बटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे एक सॉंग असतं,
ज्यातल कंटेन्ट राईट आणि ग्रामर रॉंग असतं,
सुचत नाही तेंव्हा तुमच्या हार्ट मधलं पेन असतं,
आणि जेंव्हा सुचतं तेंव्हा नेमक खिचात पेन नसतं,
पटलं तर पप्पी आणि खटकल तर खेटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं,
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं,
शे की, शे की हातामधून थरथरणार वर्ड असतं,
नुकतचं पंख फ़ुटलेल क्युट क्युट बर्ड असतं,
होप फ़ुलं डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे ऍग्रीमेंन्ट असतं,
५० परसेंट सर्टनं आणि ५० परसेंट जजमेंन्ट असतं,
ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं,
सगळा असतो थेट सौदा,काही सुध्दा लेंन्ड नसतं,
हार्ट देउन हार्ट घ्यायचं सरळ साध बार्टर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं,
लाईफ़च्या पेस्ट्रीवरील स्वीट स्वीट क्रिम असतं...........

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा Reply

बाळु सकाळी न चुकता ८.२१ पकडणार
संध्याकाळी कसा बसा ६.५२ला लोंबकळणार
चुकुन विंडोसीट मिळताच बाळु धन्य होणार
तो बिचारा मध्यमवर्गीय तो असाच रहाणार

कधी सरकार कोसळणार
कधी शेअर बाजार वधारणार
बाळु मात्र निर्विकार रहाणार
सकाळी न चुकता ८.२१ पकडणार

माणुस हा मरणारच, कधी बाळुचंही कोणी मरणार
पराकाष्ठेने बाळु डोळ्यातुन दोन थेंब सांडणार
पोचवुन आल्यावर बादलीभर पाण्यात अंघोळ करणार
दुस-या दिवशी सकाळी ८.२१ पकडणार

श्रावणात घन निळा बरसणार
आजुबाजुला मोगराही फ़ुलणार
पिसारा फ़ुलवुन मोरही नाचणार
बाळु मात्र न चुकता ८.२१ पकडणार

दिवसभर ऑफ़िसात बाळु पाटया टाकणार
साहेबाच्या शिव्यादेखील मख्खपणे ऐकणार
घरातल्या कटकटींतही बाळु तटस्थ राहणार
सकाळी मात्र न चुकता ८.२१ पकडणार

कधीतरी बाळु म्हातारा होणार
निवृत हौउन निवांत आयुष्य जगणार
८.२१ च्या वेळेला थोडा अस्वस्थ होणार
८.२१ मात्र न चुकता बाळुशिवाय धावणार

चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्‍त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

तुझ्याशी काय काय बोलायचं,
हे आधीच मनाशी ठरवून येते...
पण तू समोर आल्यावर मात्र,
सारं काही एका क्षणात विसरून जाते !

मनात साठवलेले शब्द,
तुला पाहिल्यावर मनातच राहतात...
मनातील भाव मग हळूच,
डोळ्यांमध्ये उतरतात !

सुरू होते मग नजरेची भाषा,
जी कळते फक्त तुला नि मला...
वाटते असेच हरवून जावे तुझ्या डोळ्यात,
विसरून साऱ्या जगाला !!!

एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

महाराष्ट्रातील अठरा शक्तीपीठंापैकी विरारच्या जीवधन गडावरील या देवीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. गाईच्या रुपात प्रकट झालेल्या देवीने गडावरुन जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला जीवदानीचा डोंगर आणि तेथे वास्तव्य करणारी आदिमाता जीवदानी म्हणून प्रसिध्द झाली. पायथ्याशी गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करुन तिथे मूतीर् बसवण्यात आली आहे. या परिसरात अनेक पांडवकालीन गुंफा आहेत. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. शेजारीच मानकुं ड नावाची पाण्याची कुंडं आहेत. डोंगरावरुन खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहीण बारोंडा देवी आणि महादेवाचं मंदिर आहे. आता फनिक्युलर रोप रेलचा प्रकल्प लवकरच पूर्ण होत असल्याने गडावर जाणे सोपे होईल.

एकदा लालबहादूर शास्त्रीजी नैनी येथे गेले होते. तेथे सरकारतर्फे एक औद्योगिक नगर वसविण्याचे
प्रयत्न चालू होते. तेथील पूर्वीपासून चालू असलेल्या कारखान्यांचे निरिक्षण करुन टबे बनविणार्‍या
कारखान्यालाही भेट देण्यासाठी ते तेथे गेले. त्या कारखान्याचे वैशिष्ट्य असं होतं की पॅकींगपर्यंतचे
काम मशीनवर असे. शास्त्रीजींना पूर्ण कारखाना दाखवल्यानंतर वर असलेल्या मोठ्या गच्चीवर
नेण्यात आले. तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मऊ आसनांच्या खुर्च्यांची सोय केली होती.

बसण्यासाठी खाली एक मोठी सतरंजी घालून ठेवली होती. त्यावर सर्व कामगार
बसले होते. शास्त्रीजी तेथे पोहचताच सर्व उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन
केले व स्वागतासाठी सर्व पुढे आले.

नंतर खाली बसले व शास्त्रीजींना त्यांच्या आसनाकडे घेऊन जाण्यासाठी कारखान्याचे
पदाधिकारी मागे वळले, तो काय ? त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली.
शास्त्रीजीनी चटकन काही कळायच्या आतच त्यांनी खुर्चीवर बसण्यास नकार दिला व
गंभीरपणे म्हणाले, मी या जनतेचा माणूस आहे. माझी खरी जागा येथेच आहे.
ती खुर्ची नाही !

पांडुरंगरावांना तीन मुली होत्या. सुस्वरुप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलीमध्ये एकच व्यंग होते.
त्या तिघीही मुली बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एकाच चिंतेने पांडुरंगला अस्वस्थ
केले होते. एकदा या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून पांडुरंगने त्या तिघींना
ताकीद दिलेली होती की, पाहुण्यासमोर कुणीही बोलायचे नाही.

पाहुणे आले. चहा - फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरु झाली.
काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलांसोबत आलेले गृहस्थ म्हणाले, वा ! पदार्थ फारच छान
झालेत. तुमच्यापैकी कोणी केलेत हे ? यावर थोरली मुलगी लाजत - लाजत म्हणाली,
आईने केये नाईट, आमीट केये.

मुलगी तिच्यावर रागावून म्हणाली, अगो बाबांनी काय शांगिटले ? बोलायचे नाही म्हणून.
यावर मधली म्हणते कशी, ही बोबयी. तू पण बोबयी. पण मीच नाही बोबयी. तिघींच्या
संभाषणावरुन त्यांना बघायला आलेल्या वरमंडळींना त्यांच्या व्यंगाबाबतचे गुपित आपोआपच
समजले आणि त्यांनी ठरवलेले सर्वकाही उघडकीस आले. पांडुरंगाची तर त्रेधातिरपीट उडाली.
वर पक्षाच्या मंडळींनी तर आपोआपच काढता पाय घेतला.

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक
वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.

टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या
वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही
त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः
पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.

तो
म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे
आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ?
तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो.
त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.

त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच
नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.

मुंबादेवीच्या थोडं पुढे २२५ वर्षांपासूनचं महाकालीमातेचं काळबादेवी मंदिर प्रसिध्द आहे. साधारण तीनशे वर्षांपूवीर् रघुनाथ जोशी यांनी आझाद मैदान परिसरात या देवीची प्रतिष्ठापना केली होती. त्यांच्या निधनानंतर ब्रिटिशांनी तिचं स्थान हलवून काळबादेवी परिसरात आणलं. ही महाकालिमाता स्वयंभू आणि जागृत असून तिच्यासोबत महालक्ष्मी व सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मांसाहारी नैवेद्य न चालणारी मंुबईतील ही एकमेव देवी. मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्येला इथे मोठी जत्रा भरते.

महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या
विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात
जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्‍या घंटेनंतर
येत असे त्याला दुसर्‍या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी
असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुसर्‍या घंटेनंतर
नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे.
एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना
पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून
शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.

पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले
व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ?
जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.

पांडुरंग ' मनाची एकाग्रता कशी करावी ' या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी
भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे
गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे
आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट
आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना
विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा
आरसा बनवायचा आहे.' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल
का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले.
म्हणाले, मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी
काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?