तुझे वेड लाउनी गेले ते क्षण 
मनाला भुलवून गेले ते क्षण ,
स्वतःला फसवून , जगाला चुकवून 
नकळत कुठे पळून गेले ते क्षण .....

चमकत्या गहिऱ्या डोळ्यांत गहिवरून गेलो मी 
निस्वार्थ प्रेमजाळ्यात पूर्णत: अडकून गेलो मी ,
अंतरंगास हळुवार स्पर्शून गेले ते क्षण  
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....

अवखळ पाऊस अंग अंग भिजवत होता 
खट्याळ वारा मनात प्रेमरंग उधळीत होता ,
हव्याहव्याशा  सहवासात जागीच स्तब्ध झाले ते क्षण 
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....

तू आली सळसळणार्या वाऱ्यासारखी आयुष्यात 
तू बहरली आंब्याच्या मोहरासारखी आयुष्यात ,
हृदयाच्या वेलीवर सहस्त्र पुष्प फुलवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .... 

अचानक उमटली तुझी पाऊले एकदा दारी 
कानाकोपऱ्यात नांदली जशी लक्ष्मी माझ्या घरी ,
पाऊलखुणा हृदयात साठवून गेले ते क्षण 
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....

तुझे वेड लाउनी गेले ते क्षण 
जीवनवाट तुझसंगे चालुनी गेले ते क्षण ,
तुझी साथ देईन , फक्त तुझाच बनून राहीन 
जन्मभर हे वचन निभवून गेले ते क्षण .....

Composed by...
SONALI