|
0
comments
]
खुप आधीची गोष्ट आहे
तू माझ्या क्लास मध्ये होतीस
नाव गाव पत्ता माहित नव्हतं
पण दिसायला मात्र सुन्दर होतीस
love at first site वर माझा विश्वास नाही
पण मी तुला किती वेळा पहायचो हे मीही कधी मोजलं नाही
हलू हलू क्लास मध्ये माझी attendance वाढू लागली
नजर माझी फल्यावर कमी आणि तुझ्यावर जास्त खिलू लागली
पुढे जायचे यायचे रस्ते बदलले
कॉलेजचे lectures तुझ्या गल्लीच्या नाक्यावर कटु लागले
तुझिही नजर माझ्यावर होती .....होती मात्र संशयाची
बाकि सगळ ठीक चालू होतं पण हिम्मत होत नव्हती बोलायची
संशयाच रूपांतर पुढे गैरसमजुतित झाल होतं
माझ्या सारख्या टपोऱ्याच प्रेम तुला कधी कलालच नव्हतं
धाडस नसताना प्रेम केल होत मी
काही पावलं काय पूर्ण आयुष्याची दिशाच चुकलो होतो मी
काय करू शकत होतो मी ..तुझ्या नावाच्या चार कविता लिहिण्या शिवाय
तुला समजावणारं कोणीही नव्हत माझ्या ह्या डोळ्यांशिवाय
डोळ्यांची भाषा तुला कधी कलालीच नाही
तू माझी कधीच ...कधीच होवू शकली नाहीस
कुठलाही पाउस मला नंतर भिजवू शकला नाही
की कुठलेही वादळ माझे अश्रु सुकवु शकले नाही
कसा जगलो आहे मलाच माहिती आहे
एक एक क्षण तुझ्या अथावानिने छलले आहे
क्षण पुढे जातात ...पण मन कुठेतरी मागेच राहिलेले असतं
काहीतरी ...काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करत असतं
माझही मन अजुन त्याच क्लासमध्ये आहे
अजुनही तुझ्या त्या गोड चेहऱ्याकड़े बघत आहे
---सौरभ
|
0
comments
]
विझून गेल्या सगळ्या आशा
आकांक्षाही मग मावळल्या
तिमिर हा दाटे चोहिकडे
तरीही ,सांजवात मी लाविते
सखी ,सांजवात मी लाविते
मनात काहूर माजलेले
धुमसती विझले निखारे
फुलती या नयनी अंगारे
तरीही , अखंड प्रज्वलते
सखी, सांजवात मी लाविते
वारा वाहे असा सैरावैरा
सागरही आहे खवळला
भीषण वादळ घोंगावते
तरीही , निरंजन तेवते
सखी, सांजवात मी लाविते
सागरही आहे खवळला
भीषण वादळ घोंगावते
तरीही , निरंजन तेवते
सखी, सांजवात मी लाविते
आता कशाशी नुरले नाते
एकले येणे एकले जाणे
धूसर धूसर चित्र सारे
तरीही , वाट पुढे सारते
सखी, सांजवात मी लाविते
------संगीता सावंत कोथरुड,पुणे.
------५८२००९.
|
0
comments
]
सामान्यांचा जीव अजुनही घुसमटतोय
उच्च्भ्रुंच्या फ़क्त मेनबत्या जलतायत
सामान्यांचे जीव ट्रेन आणि रस्त्यात जाणारे
महागडे जीव फ़क्त ताजवाल्यांचे .....
महागड्या चाकातुन ........उतरनारे सेलेब्रिटी
तिथून चालत ......मेनबत्या जाळन्यासाठी
उद्वेग कशाचा .....???
मानस मेल्याचा ...???....की ताज जळल्याचा .......???
की आता वर्षभर पार्ट्या होणार नाहीत याचा....???
आपणही असतो यांच्या बरोबर ....... N Series घेउन फोटो काढत॥!!
१० आले ९ मेले...
१०० राजकारणी आले आणि एकही मेला नाही.........?
आता तर भाषणही संपली॥
लोकांचा प्रक्षोभ तर कधीचाच गाडला गेलाय
प्रत्यक्ष कृती ऐवजी नव्या शपथविध्या होतील॥
नव्या तिजोरया भरतील...... नव्या मंत्र्यांच्या ......!!!
भ्याड आहोत आपण...
लाचाऱ्यागत मदतीची भिक घेणारे....!!
स्वताचाच आक्रोश ऐकून कानावर हात ठेवणारे...!!
जगण्यापेक्षा मरनाच सोप्प जालय म्हननारे आपण
मुंबई स्पिरिटच्या नावाखाली घरून निघताना मुलांच्या तोंडाकड़े शेवटच पाहतोय अस पाहणारे आपण
धन्यवाद सहाव्या मजल्यावर बसलेल्या त्या मंत्र्यांचे
बाकि काही नाही निदान मरण तरी स्वस्त करणारे.....!!
शेवटी पुन्हा असेच जीव जाणार
पुन्हा अश्याच मेन्बत्या जळणार
सोन्याचा धुर निघनाऱ्या या जमिनितुन
आता फ़क्त रक्ताचे पाट मुरनार...!!!!
-----सागर
लाचाऱ्यागत मदतीची भिक घेणारे....!!
स्वताचाच आक्रोश ऐकून कानावर हात ठेवणारे...!!
जगण्यापेक्षा मरनाच सोप्प जालय म्हननारे आपण
मुंबई स्पिरिटच्या नावाखाली घरून निघताना मुलांच्या तोंडाकड़े शेवटच पाहतोय अस पाहणारे आपण
धन्यवाद सहाव्या मजल्यावर बसलेल्या त्या मंत्र्यांचे
बाकि काही नाही निदान मरण तरी स्वस्त करणारे.....!!
शेवटी पुन्हा असेच जीव जाणार
पुन्हा अश्याच मेन्बत्या जळणार
सोन्याचा धुर निघनाऱ्या या जमिनितुन
आता फ़क्त रक्ताचे पाट मुरनार...!!!!
-----सागर
|
0
comments
]
हसऱ्या मुखवट्यात फिरताना आरास दिव्यांची भवति..
सडा फुलांचा अन हास्याची कारंजे दारी उडत होती ..
उतरवाच मुखवटा तो ..चित्र रात्रीपारी मावळले ..
पाणी पडले त्या चित्रावर जसे दिवे तेथले सारे हळूच विझले ..
दिसले दुख तिला...पण तेव्हा कोणीच जवळी न्हवत ....
एकटीच आणि सोबत एका मंद दिव्याची वातच तेवढी तेवत ..
वातही ती जणू शोभेची बाहुली ..देखाव्याला बसलेली ....
विझली नसली तरीही ....फिकीर सोडून सारी शांत निझलेली ..
अंधार फक्त स्तब्ध बघत होता ..निष्पाप बाळासारखा कदाचित जाणून बुजून ..
जणू आयुष्यभराचे ऋण करतोय त्या तोरयाने वाऱ्याला अडवून मंद उजेड ठेऊन ..
चार भिंतीतल्या दार खिडक्या पण दूर निघून गेलेल्या ...
आत आणून तसच टाकून रस्ता सांगण्यास विसरलेल्या ...
या सर्वांमध्ये एकटीच ती....
मुखवट्याचे आणि चेहऱ्याचे आज खरे सत्य कळले ..
पण का ..अजून नाही मनाने या मुखवट्याला नाकारले ...
का अजून मन शोधताय सत्य आणि स्वप्नांची सांगड ...
ठावून असून कि ते सूर्य चंद्रापरी एकत्र येणंच अवघड ...
प्राजक्ता
१०-८-०९
जणू आयुष्यभराचे ऋण करतोय त्या तोरयाने वाऱ्याला अडवून मंद उजेड ठेऊन ..
चार भिंतीतल्या दार खिडक्या पण दूर निघून गेलेल्या ...
आत आणून तसच टाकून रस्ता सांगण्यास विसरलेल्या ...
या सर्वांमध्ये एकटीच ती....
मुखवट्याचे आणि चेहऱ्याचे आज खरे सत्य कळले ..
पण का ..अजून नाही मनाने या मुखवट्याला नाकारले ...
का अजून मन शोधताय सत्य आणि स्वप्नांची सांगड ...
ठावून असून कि ते सूर्य चंद्रापरी एकत्र येणंच अवघड ...
प्राजक्ता
१०-८-०९
|
0
comments
]
पुरे पुरे हा बहाणा
सोड राग जीवघेणा
गडे , तुझा हा अबोला
आता मला साहवेना
गोड प्रेमळ शब्दांची
नित्य बरसात व्हावी
आणि तुझ्या लोचनांत
माझी प्रतिमा दिसावी
खोटा खोटा रुसवा
बघ क्षणात निवेल
तव प्रेमाच्या सिंचने
प्रितवेल बहरेल
पुर्वेचि केशरलाली
कशी पसरली गाली
तुझ्या मुग्ध हसण्याने
खूण प्रितीची पटली
------संगीता सावंत कोथरुड , पुणे.
------८८२००९.
बघ क्षणात निवेल
तव प्रेमाच्या सिंचने
प्रितवेल बहरेल
पुर्वेचि केशरलाली
कशी पसरली गाली
तुझ्या मुग्ध हसण्याने
खूण प्रितीची पटली
------संगीता सावंत कोथरुड , पुणे.
------८८२००९.
|
1 comments
]
आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी
चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई
येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
- यशवंत
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई
येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
- यशवंत
|
0
comments
]
मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं .............
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं …..
नावेला किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणी पुढे येत नसतं ..........
वादळात नावेला वाचवण्यासाठी आपणच आपलं नावाडी व्हायचं असतं ...............
पाण्याच्या थेंबाना मोल सहज येत नसतं.........
निसटत्या पानावर थांबून दवबिंदूनी आपणच आपला अनमोल ठरायचं असतं.......
पांढऱ्या रंगाला सौंदर्य असंच प्राप्त होत नसतं ...........
त्यासाठी त्याने पाण्याआड जाऊन इंद्रधनू म्हणून उमटायचा असतं.......
आयुष्य दिलं आहे म्हणून जगायचं नसतं........
आपल्यातलाच आपलं शोधून आयुष्याला घडवायचा असतं.....................