त्या रणरणत्या उन्हात
एक झरा दिसला
त्या दिसलेल्या झर्याने
गारवा माझ्या मानस दिला
त्या गारव्याने दुरुनही
सुख मजला मिळत होते
पण .....
जवळ त्याच्या जाउन कळाले
ते एक म्रुगजळ होते.

त्या भयाण अंधारात
एक प्रकाश किरण दिसला
त्या प्रकाश किरणाने
मार्ग मजला दाखवला
तो मिणमिणता प्रकाशही
दिलासा मज देत होता
पण ....
त्याच्या नाहीसे होण्याने कळाले
तो एक काजवा होता .

ग्रीष्माच्या काहिलित
मंद वारयाची झुळुक आली
ती गार झुळुक
मनास हवीहवीशी वाटली
ती मंद झुळुक गारवा
मला देत होती
पण ...
नंतरच्या पडझडीने कळाले
ती वादळाची सुरुवात होती.

प्रसन्न सकाळी तिची वाट पाहतो,वाटेवर तिच्यासाठी नयनफ़ुले अंथरतो
ती सहज बागडत येते , मी शांतपणे स्वप्नांचे निर्माल्य गोळा करतो

ती समोर असता नजर हटत नाही,तिची नजर वळता बेभान मन आवरतो
तिच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित,हळुच मनाच्या तिजोरीत साठवतो

काय वर्णावी ती मोहक अदा, जणू परिसाची जादू त्या नयनी
अमृताहून गोड असे वाणी , एका कटाक्षाने मी सुताने स्वर्ग गाठतो

बहुत असती भ्रमर फ़ुलांभोवती,इथे तर साक्षात कमळाचा थाट
प्रत्येक मनी एक आस, मीसुद्धा आशेचा जुगार पणास लावतो

कित्येक रस्तांमधे असा मधेच हरवलो,त्याची मोजदाद कशाला
नवीन खेळ, मात्र कायदे जुनेच, मला परत हरवायला

असु दे तरी, मनाला आवडतो हा फ़सवा लपंडाव
यावेळी तरी पुर्ण डाव जिंकीन, असतो मनी प्रबल भाव
पण पोतडीतला तो धीर,ऎन वेळी चोरवाटे पळ काढतो
उसन्या अवसानाचे ठिगळ जोडुनही, रोज आशेचे लक्तरं फ़ाडतो

म्हणून अद्याप तरी मी तिला रोज फ़क्त पाहतो, पापण्यांसोबत मग मनातलेही दडवतो
वाळवंटात का असेना, मृगजळात पोहण्याचे स्वप्न मात्र रोज पाहतो

----कुणाल----

माझे कोडे, थोडे थोडे......... तुझ्या-माझ्या डोंगरां-मध्ये..
पाणी भर ना!
कानी हाक येता माझी..
झणी तैर ना!

तुझ्या तळव्यावरच्या रेषा..
सोलून दे ना!
मोजून तागडीत माझ्या बस..
तोलून घे ना!

माझे कोडे थोडे थोडे..
यारा सोडव ना!
पारा वादळाचा चढता..
वारा थोपव ना!

तिजोरीची कळ दाबून..
हाSजी खोल ना!
माझी कळ कळण्या,
माझी..ओझी पेल ना!

अदृश्यशी वहाण माझी..
घालून देख ना!
चालून फाटले कातडे तर..
सोलून फेक ना!

रेशमाच्या लडीतून..
गंधाळली रातराणी.
माती झाली वेडीपिशी..
जरा शिंपताच पाणी.

नव्हाळीची थरथर..
श्वास वादळाच्या खुणा.
मिटलेल्या पाकळीचा..
देह कापे पुन्हा-पुन्हा.

गुढ प्रदेशाच्या वाटा..
अंधारात जाणलेल्या.
झंकारती वेड्यापिश्या..
तारा उभ्या ताणलेल्या.

लक्ष पेटलेल्या लाटा..
घेती कवेत किनारा.
नाचणा~या मयुराचा..
स्पर्श ओठ खोलणारा.

येता एक उंच लाट..
काळ थांबला वाटतो.
शुभ्र चांदण्यांचा खच..
लाल मातीत साठतो.

सारे काही विसरले..
अमृत ते बरसता.
'जगलो' मी असा फक्त..
तोच एक क्षण होता.

धर्म,जात,राष्ट्राच्या नावे, विध्वंसाचा पाया खोदत
थडग्यामधुनि प्रेते उठली, रक्ताचे पाणवठे शोधत

गर्वाचि ते मदिरा प्याले
शब्द पेटते हाती धरले

आग पाहणे छंद तयांचा, फिरती झुंडीना संबोधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

मेंदू त्यांचा जरी सडलेला
स्वार्थ साधणे कळते त्याला

थंड सुरीने मान छाटती, असतील जेही त्यांना रोधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

करण्या आपले उखळ पांढरे
तयार केले मठ्ठ मेंढरे

असे विषारी साप पाळले, विष जयांना नाही बाधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

रम-गम..
इथे सनम.
दुनियेला..
दाखव दम.

एक शिखर..
खिशात भर.
खिसा घट्ट..
पकडून धर.

तुझंच जंगल..
उडव दंगल.
डाव पहा..
कसा रंगल!

दगड काळीज..
पुरून टाक.
नको ऐकूस..
त्याची हाक.

सळसळ मखमलं.. तसं मऊशार फुलं..
केसराचं रान ओलं..
काळजात शहारलं.. मन आज तरारलं.

देठातून दाटलेलं..
हळुवार मिटलेलं..
दाही दिशा वाटलेलं..
दवामधे भिजलेलं... मन आज तरारलं.

मोतियांनि सजलेलं..
मातीमधे रुजलेलं..
हसताना लाजलेलं..
अंतरात फुललेलं... मन आज तरारलं.

वा~यासवे झुललेलं..
जगावर भुललेलं..
स्पर्शामुळे खुललेलं..
स्वत:वर वेडावलं.. मन आज तरारलं

जग मुठीत भरताना..
आतलं गेलं सुटून.
भासात सुख शोधताना...
श्वास गेला मिटून.

आयुष्यावर माझ्या..
असा पडलो तुटून..
पहाता पहाता नेले..
मीच मला लूटून.

मोठ्या हौसे मौजेनं..
रोज पाहिलं नटून.
जमवली काडी-काडी..
बाजाराशी झटून.

खेळलो ज्याही वस्तुशी..
तीला गेलो विटून..
बोललो,ऐकले इतके..
कान गेले किटून.

कस्तुरीच्या गंधासाठी..
जगणे बसले हटून.
गंधामागे धाव-धावुनी..
उर गेला फुटून.

चोहीकडे सुंदर फुले..

दिसत होती उठुन.

सारी सारी कागदाचीच..

गंध येणार कुठुन ?

श्वास,प्रेम अन् अन्न-पाणी..
जगायला इतकं पुरेसं नसे ?
पैसे पैसे.. किती लागतात असे ?

हवे कशाला बंगले नी महाल ?
साध्याशा घरात समाधान वसे.
पैसे पैसे.. किती लागतात असे ?

गाड्या-घोडे, नोकर-चाकर..
यांच्यावाचुन अडतेच जसे..!
पैसे पैसे.. किती लागतात असे ?

हजार वस्तु, खर्चिक चंगळ..
सारे करूनही शांती असे ?
पैसे पैसे.. किती लागतात असे ?

आंधळ्या गरजा, अनंत इच्छा..
आपल्याच जाळ्यात माणूस फसे.
पैसे पैसे.. किती लागतात असे ?

सुख जसे.. मानावे तसे.

हो. मी... मी..
मीच आहे रे ब्रह्म.
पहात आलो आहे..
तुझे लाखो जन्म.

जीवाचा तू तुकडा..
माझा लाडका
खास.कल्याण व्हावे
तुझे..हाच माझा ध्यास.

घडेल जे जे काही
विश्वास ठेव पक्का..
असेल भल्यासाठीच..
भले लागो झटका.

आई मारते फटका..
चुकतात जेंव्हा मुले.
दुखलं तेंव्हा तरीही..
त्यानेच होते भले.

तुझे भूत-भविष्य..
मीच लिहीले सारे.
बदलू शकशील काही..
तुला वाटते का रे ?

सोपऊन दे मजवर..
तुझ्या चिंतांचा भार.
पहा कसे सहजच..
उघडते मुक्तीचे द्वार!

काय सांगु तुला कोणत्या पेचात पडलो,
तुझ्याच साठी प्रत्येक रात्री कित्येक वेळा रडलो....

माणुस नेहमी म्रुगजळाच्यामागे धावतो,
उगाच आपल्या कोणत्याही मोहाला फसतो....

वरुन देवपण आपली मजा बघत असतो,
खरच का तो आपली परिक्षा घेत असतो....

म्हणतात ना त्यागातच सुखाचा उपभोग आसतो,
म्हणुन चारचौघात मी अश्रु लपवुन हसतो........

आनंद....

मन माझं वेडं तुझ्याच कडे धावतं,
देह त्याला साथ देत नाही म्हणुन माझंही फावत..

कितिही ठेवला तरि तुटतो मनावरचा संयम,
तरीही देह असतो आपल्या निर्धारावर कायम.....

या दोहोंच्या द्वंद्वात तु जेव्हा माझ्या समोर येतेस,
माझी नजरच तुला सर्व काही सांगुन जाते..........

आनंद....

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,


म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आई तुला प्रणाम

आई तुला प्रणाम ॥ धृ ॥

सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम


कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम

तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम

तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम
===मराठी रुपांतर - श्री. नरेंद्र गोळेदिनांक - ८ ऑगस्ट २००६

नाही वाटले कधीही
कुणा दुसऱ्यावरती झुरावे
तुझ्या नकाराने का माझे
जन्मांचे प्रेम सरावे?

नसते काही कळ्यांच्या
नशिबी भाग्य फ़ुलाचे
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी
जन्म घेण्याचे थांबावे?

खचलो जरी मी आज
राहेन उभा नव्याने
उरी जपुन ठेवीन मात्र
माझे हे अर्धवट गाणे

जाशिल तू जिथेही
तव पायी सुख नांदावे
इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी
की तव शुभहीतही न चिंतावे!!

जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र
मांडेन माझे गाऱ्हाणे
विचारेन, इतके का शुल्लक होते माझे हे प्रेम दीवाणे?

मौनाची एक वेगळीच भाषा असते,
कळणाऱ्यालाच फक्त ती कळत असते...
शंभर वाक्य बोलण्यापेक्षा,
एका मिनिटाचं मौन बरंच काही सांगतं!

ह्र्दयात उसळणाऱ्या त्या लाटा,
डोळ्यातनं समोरच्या भिडतात,
मनापर्यंत पोहोचण्याचा,
सर्वात सोपा मार्ग शोधतात...

मन व्याकूळ होतं जेव्हा,
भावना मांडायच्या असतात जेव्हा,
मौन एक मोठं माध्यम तेव्हा,
अचूक पत्त्यावर पोहोचण्याचं,

चूकीच्या वेळी पण मौन ठेवू नका,
मनातलं दुःख मनात दाबू नका,
डोळ्यातनं आक्रोश आलं,
तर डोळे पाणावतील,
आणि समोरच्याला वाटाल तुम्ही कमकुवत,
रडणारे!मौन धारण करू नका तेव्हा,
बोलणं तेव्हा सोयस्कर!इतर वेळी मात्र,
मौनाचं आहे कबूतर!

विपत्तीमधे तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही;

विपत्तीमधे मी भयभीत होऊ नये; हीच माझी प्रार्थना आहे.

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं

तू सांत्वन करावस अशी माझी अपेक्षा नाही;

दुःखावर जय मिळवता यावा,

एवढीच माझी इच्छा.

माझं तारण तू करवसं

मला तारावंस, ही माझी भावना नाही;

तरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं

एवढीच माझी इच्छा.

माझं ओझं हलक करुन

तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही;

ते ओझं वहायची शक्ती माझ्यात असावी

एवढीच माझी इच्छा.

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन, मी तुझा चेहरा ओळखावा

दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील

तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये

एवढीच माझी इच्छा.

रविन्द्रनाथ टागोर.

पुन्हा एकदा पावसात.
तिची माझी झाली भेट..
त्या ओल्याचिंब दिवसात............

समोर मी दिवसताच
मना पासुन हसली ती...
उशीर का झाला??? म्हणत,
थोडीफार रुसली ती...

देताच नजर नजरेला..
थोडीशी... ती वरमली.
जवळ ओढून घेताच
थोडीशी....ती शरमली.

बाहेर पावसाची रिपरिप
झोंबणारा वारा.
चिंब मनं...चिंब तन...
आसमंत सारा.

अगदी नेमक्या क्षणी,
वीज सुद्धा कडाडली.
मिठी अधिक घट्ट होऊन
ओठापाशी स्थिरावली.

तिच्या ओठांशी.......माझ्या ओठांचे.......
बंध अचानक जुळुन आले
कुणी तरी रसिकतेने...
त्यालाच चुंबन म्हणाले.

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात..
तिची माझी व्हावी भेट
एका ओल्याचिंब दिवसात






आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,


नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

फोन मात्र मीच करायचं,H.....R... U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

परवा दादर स्टेशनवर एक मित्र मला दिसला॰॰॰
मला तॊ खूप खचलेला वाटला
विचारपुस केल्यावर लखलखत्या दिव्यांसमॊरही
अचानक अंधार पसरला
तॊ म्हणाला परवा महालक्ष्मीला चाललॊ हॊतॊ
पॊराला बायकॊसॊबत लेडीज मध्ये चढवून
स्वतः जेन्टस् मध्ये चढलॊ
अचानक मॊठा स्फॊट झाला॰॰॰ हसता खेळता माझा मुलगा
काळ्या धुराआड लपला
मी आणी बायकॊने त्याचा शॊध घेतला
लाल चिखलातुन त्याला अक्षरशः खेचून काढला
जरा थकलेला दिसला॰॰॰ म्हणून बायकॊच्या कुशीत विसावला॰॰॰
सुजलेले डॊळे किलकिले करून आम्हाला म्हणाला
बाप्पाने आठवण काढली आहे बाबा मी पुढे जातॊ
पण तुमची आठवण खुप येणार
रात्री झॊपताना गॊष्ट मला कॊण सांगणार
शांतपणे डॊळे मीटलेल्या माझ्या मुलाकडे बघुन
स्टेशनचा खांबन् खांब द्रवला
भुकंपाने धरणी काय हादरेल असा स्टेशनचा
वासान् वासा कापाला
पॊराने पदर घट्ट धरला म्हणून ती ही सॊबत गेली॰॰॰॰
दॊष नसताना दुःखाचा डॊंगर हाताने उकरतॊ आहे
त्यांच्या स्मृती सागरातील एक एक शिंपला
भरल्या डॊळ्यांनी जपतॊ आहे॰॰॰॰॰
अचानक मीत्र समॊरच्या गर्दीत नाहीसा झाला
तॊबा गर्दीतही तॊ एकाकी वाटला॰॰॰॰




शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात
कळलंच नाही, 'काय बघितलं होतं कुलंकर्ण्याच्या हेमात?
कुलंकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं
नाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन
वारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया
रूप पक्क काकूबाई... पण अभ्यासावर माया
गॅदरिंगमध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं
नारळीपौर्णिमेला तिनं मला नारळीभात वाढला होता
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली
शाळेमधील प्रेमकहाणी शाळेमध्येच विरून गेली
थोड्याच दिवसांत वेगळं व्हायची वेळ आमच्य्यवर आली होती
मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती
पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढं हेमाचं काय झालं? हे विचारायचंच राहून गेलं
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली
'ओळखलंच नाही मी..' म्हटल्यावर खुदकन गालात हसली
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय बदल झाला होता
चवळीच्या शेळेंला जणू आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती
सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, "हे आमचे हे"
"बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे
बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवऱ्यासमोर मलाच 'मामा' केलं होतं
म्हणून, आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात..........

हल्ली संध्याकाळी केवळ
गजरा आणुन चालत नाही
"De Beers" च्या डायमंड शिवाय
गालावर खळी खुलतच नाही!

चौपाटीवर फ़िरुन केवळ
तीचे मन आता रमत नाही
"बरिस्टात" पैसे मोजल्याशिवाय
प्रेमाची नजर मिळतच नाही!

रातराणीचा मंद दरवळ
आता तिला जवळ ओढत नाही
'चार्ली' नी 'ब्रुनो' फ़वारल्या शिवाय
रुसलेली कळी फ़ुलतच नाही!

खरच, प्रेम किती महाग झालय नाही




आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
एक मेकांना दिलेल्या दुःखांवर
एक मेकांसोबत घालवलेल्या अनेक

आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
अनेक जुन्या आठवणींनी आणलेले
एक मेकांच्या डोळ्यातील
आनंदाश्रु पुसण्यासाठी.....
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या
हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एक मेकांचा हात धरण्यासाठी,
एक मेकाला सावरण्यासाठी............



ना आम्ही लग्न करणार,
ना आमच्या मुलाना करू देणार.

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..

खोक्यावर खोका टी. वी. चा खोका ...............
खोक्यावर खोका टी. वी. चा खोका ...............
मी त्याची पांढरी मांजर आणि बंड्या मज्हा बोका ............

सोन्याची पैठणी तिला चांदीचा काठ,

सोन्याची पैठणी तिला चांदीचा काठ,

दुसरीकडे बघाल ना, माझ्याशी आहे गाठ.....


पुन्याचा रहानार, चा लै पिनार

चा देते करुन, कप देते भरुन.

केळीचं काढते साल,

अन रावांच्या नावाने कुकु लेते लाल!

नावा-गावाची काय बिशात, ----राव आहेत माझ्या खिशात!

कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी

माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी

अंगणात पेरले पोतेभर गहू

यादी आहे मोठी कुणा कुणाचे नाव घेऊ।


चांदीच्या ताटात ठेवले होते गहू

लगनच झाले नाही तर नाव कसे घेऊ

तेलाच्या दिव्याला तूपाची वात

.............. करून लग्न लावली आयुष्याची वाट



इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय

.............. अजुन आले नाहीत, पिऊन पडलेट की काय ?

वन टू थ्री ........................
........ चे नाव घेतो मला करा फ्री

ह्या टॉपिकला १०० उखाणे झाले पूर्ण
___ ने काल जेवण बनवले ते झाले अजीर्ण


नविन घेतले घर, घराला लावली घंटी

मी बबली आणि ____ माझा बंटी


चांदीची वाटी त्यात होता खवा

........ च्या साठी केलाय चाबुक नवा

चांदीच्या ताटात बर्फिचे तुकडे
घास घालते मर तुकड्या थोबाड कर इकडे

ताटात ताट वाटीत वाटी
आमचे हे सोडून बाकि सगळे घाटी

चांदीच्या ताटात ठेवल्या मि लसूण.
........रावांचे मीत्र आले गाढवावर बसून

परातीत परात स्टीलची परात....
परातीत परात स्टीलची परात...........
च्या लग्नाला माकडांची वरात

परातीत परात स्टीलची परात....
परातीत परात स्टीलची परात...........
च्या लग्नाला माकडांची वरात

इंग्लिश मधे पतंगाला म्हणतात kite
आणि ........ saturday night Full tight

तेलाच्या दिव्याला तुपाची वात
xxxxxशी लग्न केले ..आता औश्याची वाट

संपात संप कामगारांचा संप
xxxxxx च्या हातात देकनांचा पंप

xxxxxxxx शी लग्न झाल्यावर भानगडी झाल्या सुकर
मी जाते फिरायला .... लावतात कुकर

घरात घर माजघर - माजघरात फदतालफदतालात डब्बा - अन डब्ब्यात आहे खवा
xxxxxxxxx येतील घरा मित्रोनो , आता तुम्ही जावा

आयलीवर पायली, पायलीवर भुंगा,
हनीमूनला जावु, करु गाडिमधे दंगा.

इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर;
गणपतरावांचे नाव घेते फाल्गूनरावांची लव्हर............

कपावर कप, सात कप, त्यावर ठेवली बशी,
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी..........

***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात
मून_____चं नाव घेते _____ची सून.

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट गणपतराव एकदम खेकसले फारच बाई तिरसट

गणपतरावांचा नि माझा संसार होईल सुखकर;
जेव्हा मी चिरेन भाजी आणि तो लावेल कुकर

गणपतरावांचा नि माझा संसार होईल सुखकर;
जेव्हा मी चिरेन भाजी आणि तो लावेल कुकर

बायको --: हंड्या वर हंडे ७ हंडे..............

त्या वर ठेवली परात......

त्यात ठेवल्या चकल्या..............

माझा नवरा टकल्या................

गोव्यावरून आनले मोठे मोठे काजू ,

गनपतरावांच्या थोबाडात मारायला मी कशी लाजू ?

तेन्दुल्कर च्या ब्यात्ला नम्स्कार कर्ते

वकुन सौर्व्चे नाव घेते पाच गदी राखुन.............

जिन्यावर अंधारात

घाईने ती जात होती

केस चुम्बायला गेलो आले

गंगावन हाती

गल्लीतल्या चिखलात लाल कमळ उमलले ,

गणपतराव त्यात पडले त्यांना चौघानी उचलले .

इवले इवले कान ,इवले इवले पाय,
गणपतराव अजुन आले नाही पिउन पडले की काय ?

रात्रीच्या वेळी कोंबडी कूकती

अन ह्यांना बघून गल्लितली कुत्री भुकती

चांदीच्या ताटात सोन्याचा पेला

सखाराम मेला म्हणुन तुकाराम केला

शब्दही न बोलताअबोल साथ करते,
ती मैत्री.गवगवा न करताएकलेपण मिटवते,
ती मैत्री.खूप व्याप्‍त असतानाहीआवर्जून आठवण काढते,
ती मैत्री.हज्जार शब्‍द सांगत नाहीतते एका शब्‍दात कळवते,
ती मैत्री.उद्‍वेगल्या मनालाशीतल शांतवते,
ती मैत्री !!