आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पहनारी माणस आहोत. दगडात देव असतोच . मूर्ति असतेच. दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो . मूर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फेकून द्यायचा भागाकडे नको. आणि मग ह्याच भावःनेन निसर्गातल्या इतर गोष्टिकंडे पहा . झाड़, नद्या, आकाश, वारा, जमीन आणि शेवटी माणूस. मानसातालाही नको असलेला भाग दूर करायला शिका . ह्याची सुरुवात स्वत हा पासून करा. स्वत:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यपयी आपला आनंद , प्रगति, निष्ठां आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार तो विचार. हा टाकायचा भाग .......

मी आहेच असा
मी आहेच असा
मी आहेच असा मैत्री करणारा
मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारा

मी आहेच असा सतत बोलनारा
मित्राना नको ते प्रश्न विचारनारा
प्रश्न विचारुन त्याना सतवनारा
उत्तरे संग म्हणुन
तगादा लावणारा


मी आहेच असा मस्त जगनारा
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा
आपल्यातच आपलपन जपनारा
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा

मी आहेच असा मनासारख जगनारा
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारा

मी आहेच असा सर्वांच ऐकनारा
आई वडील याना देव माननारा
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा

जो नाही राहिला महाराष्ट्राचा,
तो काय होणार मराठी माणसांचा..........
मनसेचा झेंडा फडकला,
पिंजऱ्यात वाघ अडकला...
मुंबई आहे मराठी माणसाची,
नाही कोणाच्या बापाची..........
ज्यानी लावली महाराष्ट्राची वाट,
ते काय आणणार नविन पहाट.....
सत्तेसाठी सातशे साठ........
महाराष्ट्रासाठी एकच मराठी ह्रदय सम्राट..... राजसाहेब ठाकरे....
मराठी माणसामध्ये केली भैयांची भिंत निर्माण,
हेच का तुमचे हिंदुत्वाचे पुराण......
जो आयुष्यभर राहिला अनपड गवार,
तो काय करणार "मराठी द्रोहिंवर" 'प्रहार'?
ज्याला आहे भैयांनवर प्रेम,
तो काय करणार मराठीवर सप्रेम....
ज्याने ऐकले छट्पूजेत भैयांचे गीत,
तो काय करणार मराठ्यांचे हीत?
सदध्याच्या सुधारलेल्या राजकारणाला 'राज'कारण आहे!
आता फ़क्त महाराष्ट्रात "मराठी" करनच आहे!!!
राजसाहेब अंगार आहेत,
बाकी सगळे भंगार आहेत!

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...

मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे

मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...

पुसत जावेत ढगांचे आकार

आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ

त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,

भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग

आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात

विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,

वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट

ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी

सरोवर मात्र अजूनही तिथेच...

पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली

आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित

पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...

माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी

चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...

थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...

बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...

तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...

आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...

पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...

वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..

डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..

तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..

शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..

विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..

या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...

विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..

विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..

अन् विसरत चालले आहे...

आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी मराठी आहे कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..
मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..

मी मराठी आहे कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकले तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..

मी मराठी आहे कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं..

आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..

आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..

आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात..

आम्ही मराठी आहोत अगदी अत्याधुनिक

नमस्कार
लक्ष कोठे आहे....मी नमस्कार केला...आपल्याला
आणि आपल लक्षच नाही आमच्याकडे.
कामात आहात का ?
कामात की माझी प्रोफाइल बघण्यात ??
आत्मस्तुति वाईट परनिंदा त्याहून वाईट...
असे थोरामोथ्यानी सांगितले आहे.... त्यामुले तसले काही इथे करू नए....
केल्यास... योग्य ती कारवाई केली जाइल....
चोरी करणे पाप आहे.... असं मोठीमानसे म्हणतात.....
म्हनुनच माझ्या प्रोफाइल मधील फोटो स्क्रैप विडियो आणि मित्र-मैत्रिणी
चोरु नये....

नमस्कार,
गेले काही दिवस तुम्ही बघत असाल की आम्हीमराठीवर बरेच बदल झाले आहेत. तुम्ही विचार करत असाल हे सगळे अचानक का?…कारण आम्ही मराठी आता चवथ्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि ह्याच निमित्ताने आम्हीमराठीने एक online कविता स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. ह्या स्पर्धेची माहिती व नियम पुढील प्रमाणे
स्पर्धेची अटी व नियम :
१.१.कविता text / picture कोणत्याही प्रकारात चालेल पण देवनागरीमध्येच लिहिलेली असावी
१.२.एक कवी जास्तीत जास्त ३ कविता स्पर्धेसाठी पाठवू शकतो
१.३. सर्व कविता kavita@aamhimarathi.in ह्या पत्तावर खालील प्रकारे पाठवाव्या
Sub : MNS-Aamhimarathi Kavita Spradhesath
कवीचे नाव :
कविता:
कवीचे संकेतस्थळ / वेबलिंक
३. तुम्ही कविता कोणत्याही विषयावर व कोणत्याही प्रकारमध्ये पाठवू शकता.
४.कवितेला आम्हीमराठीचे वाचक rate करतील आणि त्यातून shortlist होणा~या १० कवितांमधून आमचे मा. परीक्षक ३ विजेत्या कविता निवडतील.
५.मिळणा~या प्रतिसादावरून विजत्यांची संख्या व बक्षिस वाढू व कमी होऊ शकते.
६.कवी स्वत: कवितेला rate करू शकत नाही.७. कवितेला voting खालील प्रकारे करता येईल
Click on Comment and fill your details and in comment write “+1″ and if you want any other comment to give you can.
८. कवितेला negative वोटींग नाही करता येणार
९.कविता स्पर्धेचा कालावधी दि.१२ फ़ेब्रूवारी ते २४ मार्च २००९ असा असेल.
१०.कवीने कुठल्याही गैरमार्गंचा वापर करून वोटींग करायचा प्रयत्न केला आहे असे निदर्शनास आल्यास त्या कवीच्या सर्व कवित स्पर्धेतून बाद करण्यात येतील.
११.स्पर्धेचे सर्व नियम बदलणे आयोजकांच्या हातात असून सर्व सहभागी त्याला बांधिल असतील.
ह्याशिवाय काही अडचणी असतील तर kavita@aamhimarathi.in वर संपर्क साधावा
तसेच स्पर्धेबाबत update राहण्यासाठी आपल्या सोयीनुसार खालील सुविधांन subscribe करा
१.Twitter
२.Feedburner
मुख्य प्रायोजक : म.न.से. पुणे
प्रायोजक ऑर्कूट कम्युनिटी :
मराठी चारोळ्या http://manasepune.com/mnspune-programs/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E2%80%9C%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0/