चंडिकादेवी ही सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातीची ग्रामदेवता आहे. चंडिकादेवीची स्थापना सुमारे १५० वर्षांपूवीर् करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईच्या गव्हर्नरचं निवासस्थान याच परिसरात होतं. (आता त्या इमारतीमध्ये हाफकिन इन्स्टिट्युट आहे) गव्हर्नरनेही या देवळाच्या देखभालीसाठी ग्रामस्थांना काही निधी व जमीन देऊ केली. तिथे आज संस्थानचं कार्यालय व धर्मशाळा आहे. या सर्व मालमत्तेला ' श्री चंडिका संस्थान ' असं नाव प्राप्त झालं असं या देवस्थानचे एक विश्वस्त मनोहर नारायण पाटील सांगतात. ' नवसाला पावणारी देवी ' असा चंडिकादेवीचा लौकिक असल्याने चैत्र व अश्विानात उत्सवांदरम्यान इथे भाविकांची रीघ लागते
ग्रँटरोड परिसरातील गावदेवीचं देऊळ २५० वर्षांपूवीर्चं आहे. सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातिबांधवांची ही उपास्य देवता आहे. गावदेवीचं लीलावती असं दुसरं नाव आहे. १८२१ पर्यंत गावदेवीची ही स्वयंभू मूतीर् अरक्षित राहिली. जुनं मंंदिर १८६५ साली तर सध्याचं मंदिर १९६७ साली बांधण्यात आलं. या देवळात गणपतीच्या मूतीर्च्या एका बाजूला गाढव वाहन असलेली शितलादेवीची मूर्ती आणि दूसऱ्या बाजूला गावदेवीची मूर्ती आहे.
मुंबईचं महालक्ष्मी मंदिर प्रसिध्द आहे. इथे महालक्ष्मी , महाकाली आणि महासरस्वती या तीन रूपांत दुर्गामाता प्रकटली असं सांगितल जातं. १७२० पर्यंत हे देऊळ वरळी गावात होतं , परकी आक्रमणांमुळे अनेक देवळातील मुतीर् सुरक्षित ठिकाणी लपवण्यात किंवा विसजिर्त करण्यात आल्या होत्या , त्याप्रमाणे ही मूर्ती समुदात विसजिर्त करण्यात आली होती. काही काळानंतर एका कोळयाच्या जाळयात ही मूर्ती मिळाली. तर काहीजण सांगतात की , जेव्हा इंग्रजांनी मुंबईच्या सात बेटांना जोडण्याचं ठरवलं तेव्हा या कामाचा ठेका दिलेल्या शिवाजी प्रभू नावाच्या ठेकेदाराला अजब गोष्टीचा सामना करावा लागला. समुदात जेवढा भराव घातला जायचा तेवढा पाण्याखाली जायचा. इंग्रजसुध्दा या गोष्टीने हैराण झाले. तेव्हा त्या ठेकेदाराला दृष्टान्त देऊन देवीने सांगितलं की , ' माझी समुदात विसजिर्त केली गेलेली मूर्ती बाहेर काढा , तुमचं काम सोपं होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्ती बाहेर काढल्यानंतर समुद शांत झाला. मग इंग्रजांनीही देवीचं देऊळ बांधायला जागा दिली.
जिच्या नावे या शहराला मुंबई म्हटलं जातं ती मुंबादेवी! साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी या देवळाची स्थापना आत्ताच्या सी.एस.टी विभागात झाली. इंग्रज सरकारने तिथे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजसेवक पांडूशेठ सोनार यांच्या प्रयत्नाने १७३७ साली आजचं देऊळ बांधण्यात आलं. मुंबादेवीच्या उजव्या बाजूला अन्नापूर्णा देवीची मूतीर् आहे. प्रामुख्याने कोळी , पाचकळशी समाजातील नवविवाहित जोडपी देवीच्या दर्शनाला येतात. मंुगा या कोळी जातीच्या जमातीवरून या देवीला मंुगादेवी असं म्हणत त्याचाच पुढे अपभ्रंश मुंबादेवी असा झाला. पुराणकथेनुसार मंुबारक या विशालकाय प्राण्याचा संहार करण्यासाठी शंकर आणि विष्णू यांच्या तेजापासून या देवीचा जन्म झाला. मंुबारकाचा संहार केल्यानंतर त्याने देवीची क्षमा मागितली आणि तिचा आशीर्वाद मागितला. तेव्हा देवीने त्याच्या नावारून स्वत:चं मुंबादेवी हे नाव घेतलं.