मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

संकट अफाट हे पाहत नाही वाट
शक्य त्या परी मदतीस सुरुवात
श्रीमंती गरिबी आणि जात पात
विसरुनी सार मदतीस धावतात

मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

निसर्गाचा मार शत्रूंचे वार
दुखाचे भार अश्रूंची धार
परिवाराचा गमावूनी आधार
नव्या उमेदीन रोज हि उठतात

मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

जखमांची आग दुख ते आठवूनी
शहिदांचा त्याग हृदयात साठवूनी
हताश न होता धीर एकमेकास देतात

मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

राजकारण्यांची क्रूर राजनीती
थोड्या वेळासाठी मन वळविती
संकटाच्या वेळी मात्र संपते हि खेळी
मदतीचा हात देऊन एकमेकास
सगळ्यांची मन हि जिंकतात

मुंबई ची माणस
माणुसकीच ना त
आगळी वेगळीच
जिद्द मनात

दिनेश ..................

गरिबांचे हे जग निराळे
गरीबीतही सुखी आहेत सगळे
जो तो आहे कर्जाखाली
आहे बेकारांची रांग भली
जिथ दारिद्र्याची मगरमिठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

जरी गरीब असले धनाने
श्रीमंती आहे मानाने
निरनिराळी आहे जात
माणुसकीचे आहे नात
नाही भेदभाव जिथ कुणासाठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

रोज भांडण तंटा मारामारी
शिव्यांची गुंजते किलकारी
अडचणीतही मग कामी येतात
भांडणारे ते शेजारी
दिलदार कधी तर कधी हट्टी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

आयुष्याची शर्यत मोठी
जो तो लढतो पोटासाठी
जिथ माणूस मरतो भूकेपोटी
जिथ आई राबते लेकासाठी
जिथ बाप झटतो इज्जतीसाठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

पैशापाई खेळ हा सगळा
मार्ग निवडती वेगळा वेगळा
कधी खूप कष्ट कधी कंटाळा
झगडे कधी तर कधी जिव्हाळा
मनी त्यांच्या हि स्वप्ने मोठी
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
या पैश्याच्या पाठी पाठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

दिनेश......

आज वीचार करत होतो तीचा,कशी असेल ती ,
स्वप्नामाधे माज्या येउन ,
हलुच हसणारी असेल की खोटा राग दाखवून रुसनरी असेल ती ,
काय माहीत कशी असेल ती,

कशी असेल ती,
भावनांचं मोल जाणनारी असेल की
मोठेपणा दाखवणारी असेल ती ,

जाणीवपूर्वक 'नातं ' जपणारी असेल की
फक्त स्वतामधेच रमणारी असेल ती .
कशी असेल ती .

फक्त बायको म्हणुन वागानरी असेल की ,
वेळो वेळी मैत्री ची पण जाणीव करून देणारी असेल ती ,

ती कशी जरी असली तरी,
तुझ्यावर असेल माझा अखंड विश्वास
आश्रू माझे पुसशील असा खात्रीचा श्वास....

युवराज ... तारीख ११ / ०८ / २००९