साहित्य - बटाटे , साखर , वेलची पावडर , केशर , दुध , बदामाचे पाटळ काप , तूप

कृती - बटाटे उकडून त्यांची साले काढून टाकावी व जाड किसणावर किसून घ्या. थोड्या दुधात केशर भिजत घाला. पातेल्यात तूप गरम करुन त्यावर बटाट्याचा किस टाकून ते मिश्रण परतून घ्या. छान तांबूस रंग येऊन रवाळ होईपर्यंत भाजून घ्या. एक वाटी बटाट्याच्या रव्याला एक वाटी दूध घाला. वेलची पावडर , बदामाचे काप , केशरचे दूध घालून चांगली वाफ येऊ द्या.

साहित्य - एक वाटी साबुदाणा , दोन वा़टी ताक , दीड वा़टी गोड दही , दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे , तूप , जिरे , मीठ , साखर

कृती - साबुदाणा कढईत भाजून घ्या. त्यावर ताक ओतून दोन तास भिजत ठेवावा. वाढायच्या आधी तूप गरम करुन जीरे , मिरच्यांची फोडणी करा. साबुदाण्यामध्ये दही घालून त्यावर फोडणी द्या. चवीनुसार मीठ व साखर घाला. मिश्रणा व्यवस्थित एकजीव करुन घ्या. हा दह्यातला साबुदाणा चवीला छान लागतो.

साहित्य - सुरण , आंबट ताक , मिरच्या , आल्याचा तुकडा , मीठ , दाण्याचा कूट , राजगि-याचे पीठ , साखर , तेल किंवा तूप

कृती - सुरणाची सालं काढून त्याचा कीस करुन घ्यावा. कीस ताकात थोडा वेळ भिजत टाकावा व नंतर गाळून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार वरील सर्व साहित्य घाला. आलं मिरच्य़ांची पेस्ट करुन त्यात घाला. कबाब करता येतील इतपत राजगि-याचे पीठ घाला. त्यानंतर गोल किंवा लांबट आकाराचे कबाब तयार करुन ते तेलात लालसर तळावेत. छान कुरकुरीत कबाब चटणीबरोबर द्यावे.

साहित्य- दोन वाट्या व-याचे तांदूळ , दोन वाट्या साखर , बेदाणा , काजू तुकडा , बदामाचे काप , तूप , वेलची पावडर

कृती- तांदूळ धुवून , निथळत ठेवा. पाव वाटी तूपावर तांदूळ परतून घ्या. नंतर त्यात चार वाटी पाणी उकळून घाला व किंचित मीठ घालून झाकण ठेवा. पाणी आटलं की साखर , वेलची पावडर , काजू , बदाम , बेदाणा घालून थोडंसं साजूक तूप घालून सांजा परता. एक वाफ आणा सांजा तयार.

साहित्य- दोन वाट्या व-याच्या तांदळाचे पीठ , एक वाटी साखर , दोन टी स्पून साजूक तूप , मीठ , दूध , खोवलेला नारळ अर्धी वाटी , दोन केळीची पानं

कृती - वरी तांदळाचं पीठ , साखर , तूप , मीठ आणि खोबरं , एकत्र करुन लागेल तेवढं दूध घालून भाकरीपेक्षा पातळ मळून घ्या. केळीच्या पानाच्या उभट लहान तुकड्यावर तूप लावून त्यावर लांबट आकारात पीठ थापून घ्या. त्यावर पुन्हा केळीच्या पानाचं आवरण द्या. तव्यावर पुन्हा एकदा केळीच्या पानाचं आवरण देऊन भाजून घ्या. वरुन झाकण ठेवा. वाफ आली की , पानगी उलटवून पुन्हा वाफ येऊ द्या. साजूक तूपाबरोबर पान खायला द्या