धोपट रस्त्याने जाताना ,
मी वाट चुकलो होतो ,
बरे झाले तू पुढे गेलीस ,
मी सर्व सुखांना मुकलो होतो .
------------------------ बाजी
तू अल्लड नदी
की
अवखळ वारा ?
तू राजकुमारी
की
माझी स्वप्न सुंदरी ?
माझ्या हृदयाची देवी
की
स्वच्छंदी सिहांची छावी ?
तू अजाण बालिका
की
चंचल मनाची संचालिका ?
तू शांत सागर
की
तू धगधगते नगर ?
तू प्रेमाची मूर्ति
की
सौंदर्याची अभिजात कलाकृति ?
तू माझी माऊली
की
माझ्या प्रेमाची सावली ?
तू जगण्याची आशा
की
तू कातरवेळची निशा ?
तू यशाचा थंड झरा
की
तू धगधगता निखारा ?
तू मंदिरातील समई मंद
की
तू जीवनातील मुक्त छंद ?
तू पहिल्या पावसाचे थेंब
की
माझे प्रतिबिंब ?
---------------- बाजी
तू अल्लड नदी
की
अवखळ वारा ?
तू राजकुमारी
की
माझी स्वप्न सुंदरी ?
माझ्या हृदयाची देवी
की
स्वच्छंदी सिहांची छावी ?
तू अजाण बालिका
की
चंचल मनाची संचालिका ?
तू शांत सागर
की
तू धगधगते नगर ?
तू प्रेमाची मूर्ति
की
सौंदर्याची अभिजात कलाकृति ?
तू माझी माऊली
की
माझ्या प्रेमाची सावली ?
तू जगण्याची आशा
की
तू कातरवेळची निशा ?
तू यशाचा थंड झरा
की
तू धगधगता निखारा ?
तू मंदिरातील समई मंद
की
तू जीवनातील मुक्त छंद ?
तू पहिल्या पावसाचे थेंब
की
माझे प्रतिबिंब ?
---------------- बाजी
तुझी आठवण आली म्हणुन
पाणवले डोळे
या जगात माझ्या सारखे
असतील किती खुळे
डोळ्यात माझ्या जमले
होते तारका पुंज
मीच माझ्या मनाशी
देत होतो झुंज
तुझी आठवण आली म्हणुन...
सुन्न पडले होते मन
पडले होते गात्र क्षीण
मीच माझे नाखुशीने
मारत होतो मन
आठवत होती तेव्हा मला
तुझी परवलीची खुण
तुझी आठवण आली म्हणुन...
आठवत होतो सहवासाचे क्षण
तुझा तो प्रश्न जपतोय मी
करशील का रे माझे रक्षण ?
पण! पण! मीच माझा
अन् तुझा केव्हाही नव्हतो
समाजाच्या बंधनात स्व:ताला
शोधत होतो , शोधत होतो स्व:ताला
आणि .....
तुझी आठवण आली म्हणुन...
मला जिंकन्याच्या प्रयत्नात
तुही हरली होती
मी मात्र हरवताना तुला
स्वताच हरलो होतो
तुही नाही, मीही नाही,
दुसरेच जिंकले होते
त्यांच्या मते त्यांनी
गुंफले होते रेशमी बंधाचे नाते.
समजले मला आज
तू लाचारीने जागतेय
स्वत:च केलेल्या चुकांचे
वाईट फळ भोगतेय
पण पण मीही...
यापेक्षा काही वेगळा नाही
इथेच मी अनुभवतोय
मृत्युची खाई
मरता मरता जगताना
जिवंत प्रेत फिरतोय,
मनात फ़क्त तुझा आणि
फ़क्त तुझाच विचार करतोय
एकदाच संपविन म्हणतोय
हे नीरस आयुष्य
दररोज मारताना जगतोय
यात नाही आता स्वारस्य
पण ....
परत शेवटी तेच आडवे येतात
सैल झालेल्या बंधनात
परत परत बांधतात
शेवटी मी ही लाचार
सहन करतोय अत्याचार
नाही होते हे सहन
मरताना तोडायचेय मला
हे जीवनातील बंधन !!!
मरताना तोडायचेय मला
हे जीवनातील बंधन !!!
---------------------- बाजी
भळभळत्या जखमेला
दाबुन मी धरले आहे
तू फ़क्त एकदाच ये
थोडेच श्वास उरले आहे ||१||
विवशतेने जातानाही
मागे वळली होती
तुझ्याच नकळत तेव्हा तुझी
आसवे खळली होती ||२||
खात्री आहे मला
तू परत येशील
मी फ़क्त तुझीच आहे
म्हणत घट्ट मिठी मारशील ||३||
तुझ्या त्या मिठी साठी
आज मी जिवंत आहे
एकदाच मागे फिरून ये
श्वास थकले आहे ||४||
तू भेटलीच नाही तर
सरण माझे खचेल
वा-यावरती राख माझी
तुझ्या कुशीत बसेल ||५||
तू नाही आलीस तरी
मी राख होऊन येईल
मी फ़क्त तुझाच होतो
ह्याची खात्री देऊन जाईल ||६||
------------------------------ बाजी
सर्वात सुंदर काय ... ?
मैत्रीतले मन ..
का ..
मनातली मैत्री ?
मनात असते तुझीच मैत्री
का ....
तुझ्याच मैत्रीत मन ?
कोडे........
मनातील तुझे विचार
का .....
तुझ्या विचारांनी भरलेले मन ?
कोडे .....
विचारां मधे फ़क्त तू
का ....
तू म्हणजे फ़क्त विचार ?
कोडे .....
तू म्हणजे मन
का .....
तू म्हणजे मैत्री ?
कोडे.....
तू म्हणजे प्रेम
का
प्रेम म्हणजे तुझी मैत्री ?
कोडे.....
----------------------- बाजी
मन आणि मेंदूत
आहे खुप मोठे अंतर
पण हे समजते खरे
वेळ गेल्या नंतर
--------------------------
शब्द तुझे , शब्द माझे ,
वाचू आपण बेधुंद ,
बघ माझ्या मिठीत येउन
लागेल तुला माझाच छंद .....
----------------------------
तुझी आठवन आली
अन शब्द मुके झाले
रात्रीच्या चांदण्यातही
मन वेडेपिसे झाले
---------------------
रात्रि गोड चांदण्यात
मला तू दिसत होती
माझ्या पेक्षा वेगळी असुनही
माझीच वाटत होती
उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||
डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||
तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||
तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||
म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||
तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ || ६ ||
---------------------------------------- बाजी
माझे मलाच कळत नाही
हे सत्य की फ़क्त आभास
तू मृगजळ की मायाजाल
मनाच्या खोल गाभा-यात
एक धूसर चित्र
खरेच तूच की फ़क्त तुझे भास
तुझ्याच आठवनिंची पंगत
आन् माझी एकाकी संगत
धूसर तुझे भास
आन् माझे एकाकी श्वास
दुरून कुठुनतरी
येतोय तुझे आवाज़
पण मला खरेच कळत नाही
हे सत्य की फ़क्त तुझे भास ?
----------------------- बाजी
मन म्हणजे पाउस ..
का
पाउस म्हणजे मन ?
पण हे मात्र नक्की
मी म्हणजे तू
का
तू म्हणजे मी ?
हे माहित नाही ...
पण हे मात्र नक्की
पावसासोबत तू असली
मी माझा नसतो
भिजलेला मी..
का
भिजलेले मन ?
पण हे मात्र नक्की
तू जवळ नसताना
पाउस एकाकी वाटतो
त्याची साथ द्यायला
मग मी ही जातो
तुझ्याच आठवणिनि आम्ही
व्याकुळ होउन धावतो
पावसाचे थेंब..
का
डोळ्यातील आसवे ?
पण हे मात्र नक्की
मी आणि पाउस
फक्त तुलाच शोधतोय
आसवांच्या पुरात ...
का
आठवनींच्या थेम्बात ?
पण हे मात्र नक्की
एक प्रश्न ...
मन म्हणजे पाउस ..
का
पाउस म्हणजे मन ?
तू मला सोडून गेल्यानंतर म्हणे, 'माझी आठवण तुला येत नव्हती',
मग का गं माझ्यासाठी रात्र-रात्र तू अशी जागून काढत होती...?
माझी आठवण येत नव्हती तरी...
माझे 'नसलेले' अस्तित्व का गं तुला सालायचे ?
अन् त्या गुलाबाच्या पाकळ्यातले पाणी ओसंडून बाहेर पडायचे..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
का गं माझ्या पत्रांची सतत तू वाट पाहायची ?
पत्र नसल्यामुळे दरवेळेला, मनातच माझ्यावर रूसायची..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
पहिल्या पावसात का गं चिंब-चिंब भिजायची ?
अन् जोडीला मी नसल्याची सल नेहमीच मनात असायची..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
का गं तुझ्या लग्न-मंडपात, तुझी नजर माझ्या वाटेकडे आसुसलेली होती ?
मन माझ्यात होते तुझे, जरी तुझ्या साथीदाराशेजारी तू बसलेली होती..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
मी 'गेल्याचे' कळताच स्मशानात माझ्याआधी तू कशी गं आली होती ?
अन् त्यानंतर तुझी जगायची आसक्तीच पार संपली होती..!
अन् कायतर...
तू मला सोडून गेल्यानंतर म्हणे, 'माझी आठवण तुला येत नव्हती...'
- केवल बेदरे
कधी सांगतेस कथा प्रेयसीची
तिच्या मनामनातून अंत:करणातून
जाणवते व्यथा त्या प्रत्येकीची
कविते...तुझ्याच शब्दांतून
म्हणूनच करीतो आहे
आज तुझ्यावरच कविता....
चिंब भिजतेस तू
ओल्या कागदांतून....
अनेकांना अशीच स्पर्शतेस
तुझ्या शब्दस्पर्शांतून
अनावर होतो अनाहूत पणे
आतूर होतो लिहीण्यासाठी
त्या हर एक भावनेतून
कविते...ही कविता फक्त तुझ्यासाठी
होतेस तू आधार
त्या त्या लाचारासाठी
होतो तुझा प्रचार
अशा कित्येक आचारांसाठी
तू वाहतेस अनेक मनांतून
तुझे अस्तित्व जपण्यासाठी,
होतेस अमर प्रत्येक पानातून
हे शब्द वाहिले तुला मी....
कविते.....फक्त तुझ्यासाठी
कविते.......होतेस तू
माझ्या विचारांतून
स्पर्शतेस मनांना तुझ्यामाझ्या शब्दस्पर्शातून
व्यक्त होतेस प्रेमातून व्यंगांतून भावनेतून
आज हे शब्द वाहीले तुला...
फक्त तुझ्याचसाठी
कविते लिहीले ही कविता
आज फक्त तुझ्याचसाठी
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....