रणरणत्या दुपारी

गुलमोहराखाली

मी उभी असते

लोकांना वाटतं..

सावलीसाठी

..

झाडावरुन तरंगत

अलगद

माझ्यावर
विसावणार्‍या


अग्निफुलांच्या आगीत

जळायचं माझं वेड

त्यांना कळेल ?



- स्वप्ना

नक्कीच तू

तूच

दुसरं कोण येणार आहे माझ्या खोलीत रात्रीचं ?

हे बघ

हे बघ मला तुझे ठसे सापडलेत

लाल नारिंगी

सार्‍या खोलीभर

पाकळ्याच पाकळ्या विखुरल्यात



रात्री खिडकी उघडीच राहिली होती वाटतं....



- स्वप्ना

माझ्या मैत्रिणी हसतात मला

म्हणतात,

काय पाहिलंस त्या वेड्यात ?



तू अशी शांत शीतल

तो असा जहाल भडक

कशी त्याच्या मोहात पडलीस ?



हिरवाईतलं तुझं ’ पेटणं ’ आठवते

अन मी मनोमन हसते..

मैत्रिणींना....



- स्वप्ना

गुलमोहरा ,

आठवतं तुला ?

जेव्हा ' त्याने '..

तुला माझ्या ओंजळीत भरलं होतं..

मी विचारात पडले होते

की ,

मला चेतवणारी आग

तुझी

की

' त्याची ' ?



स्वप्ना

त्या वळणावर

रस्त्याच्या दुतर्फा

तू उभा असतोस



माझी वाट पहात..



अन

तिथे पोहचण्याआधीच

मीही तिथेच पोहचलेली असते



तुझ्या अनावर ओढीने..



वार्‍याच्या झुळका

तुझ्या पाकळ्या माझ्यावर उधळत येतात

अन त्या वळणावर पोहचतांना

माझी हळवी स्पंदनं कोलमडतात



तुझे निखारे माझ्या वाटेवर

पसरवून तू मात्र निवांत उभा असतोस

" मला तुडव वा भिडव " म्हणत..



खाली पडलेलं एकेक फुल

पायदळी तुडण्यापासून वाचवत

मी ते वळण पार करते

टुपकन कुठल्याशा फांदीवरली

एक मोठ्ठी शेंग

माझ्या पुढ्यात दाणकन आदळून

मला घाबरवते..



पण मी मात्र तुझे निखारे चुकवत

त्या वळणाला सहज पार करते..



वळून पाहतांना..



तुला मनात बंदिस्त करते

नि ओढणीत अडकलेल्या तुझ्या पाकळ्या

अलवार पर्समधल्या वहीत निजवते..



- स्वप्ना

येणारा

प्रत्येक दिन

प्रत्येक रात

पाकळ्या पाकळ्यांनी फुलत जाणारी

आग
ठिणगी ठिणगीने वाढत जाणारी
वर्षभराचे शांत हिरवे वस्त्र

एक

एक

करुन

उतरवत
आदिम आगीने फुलत
बंड करुन उठतो

गुलमोहर

बहरतो

गुलमोहर..



- स्वप्ना

सखे,

अगं ऐक ना

अगं तो..तो....

ऐन चैत्रात बंडाचा लाल झेंडा उभारत होता

म्हणून, त्याला म्हटलं

काय हे ?

एवढा काय पेटतोस ?



तर

इतका चिडला..

इतका चिडला..

आषाढापर्यंत धगधगतच राहिला

रस्ताभर ठिणग्या

मी जाणच बंद केलं त्याच्या गल्लीतनं..



४ महिने वागून घेतलं मनासारखं त्यानं

आणि

आणि आता म्हणे..

चक्क

" शांती , शांती " म्हणत हिरवी शाल पांघरुन बसणार आहे वर्षभर



सोंगाड्याच आहे नुसता..



- स्वप्ना

तसं सकाळीही तू पेटलेलाच असतो

आता आग म्हणजे आगच ना !

पण कोवळी उन्हं जाणती होतात

अन तू धगधगायला लागतो..



जाणून असते मी

म्हणून

त्या रस्त्याने दुपारची निघतही नाही..



खिडकीतूनच डोकावते

तुला पाहते

एकटक

पाहता पाहता डोळ्यांत पाणी जमा होते

ऊर धपापते

पण नजर तुझ्यावरुन हटत नाही

तुझी हिरवी मंद सळसळ

लाल नारिंगी तळमळ

माझ्यावर गारुड करतात



खळकन पापणीआड लपलेला थेंब गालावरुन ओघळतो

मी भानावर येते

खिडकी लावते

हं , आता लक्ष विचलित होणार नाही..



तितक्यात,



इकडे कम्प्युटरवर गुलमोहराचा स्क्रीनसेव्हर चालू होतो....



- स्वप्ना

गुलमोहरा ,

आठवतं तुला ?

जेव्हा ' त्याने '..

तुला माझ्या ओंजळीत भरलं होतं..

मी विचारात पडले होते

की ,

मला चेतवणारी आग

तुझी

की

' त्याची ' ?



- स्वप्ना

कित्तीदा मी स्वप्नात पाहिलं होतं
हिरव्यागार टेकडीवरचं ते गुलमोहराचं झाड
अन
झाडाखाली निवांत पहुडलेली मी..

आज....

पायाखाली चक्क लुशलुशीत हिरवळ
अन समोर अग्निशिखा

कित्ती
साधीशी इच्छा
साधसं स्वप्नं
पण ते पूर्ण होण्यासाठी

मला ' जळावं ' लागलं....

- स्वप्ना

चैत्रातली एक झुंजूमुंजू

रविकिरणांनी नाहणारी हिरवाई

किलबिलते पक्षी

गुणगुणती हवा

नदीत उतरते प्यासे मेघ

अन हे आरसपानी सौंदर्य

डोळ्यांनी पिणारी मी

नदीकिनारी..



सवयीने

नजर स्थिरावली

इवलीशी हिरवी-पोपटी पानं ल्यालेल्या गुलमोहरावर

अन

अचानक कळलं त्याचं गुपित

एका फांदीवर लपलेलं

लालभडक तांबडी रंगातून उलगडणारं



काय आहे ते ?

पक्षी ?

नाही..

ही तर..

ही तर..आगीची नक्षी..



गुलमोहर......गुलमोहर फुलतोय.......



माझ्या ओठांवर फुललेलं स्मित

तनमनात भिनत गेलं

अन उठवत फिरलं

शेकडो लहरी

बैचैनीच्या..



पडली ठिणगी

त्या लाल तांबड्या फुलांची

माझ्या रोमारोमांत

आता ही आग शमणार नाही

पेटवत जाईल सारं रान

नाही वाचणार मीही

सारे दिन,सार्‍या राती

उठतील ठिणग्याच ठिणग्या

पानापानांवर

झाडाच्या अन वहीच्याही..



हा जन्म गुलमोहराचा

जन्म..

माझ्यातल्या आगीचा..



- स्वप्ना

सावळ्याची काया

चंद्राचा मुखडा

मायाळती माया

भाकर तुकडा



जोंधळ्याचे दान

पदरी फाटक्या

गोंधळ्याचे भान

जागरी हिरव्या



कोरड्या काठांनी

एकटी चंद्रभागा

चुकली ग वारी

रूसला ग विठा



मिरगाचा पान्हा

कोरडा आटला

आसवांचा पाट

भरून वाहिला



ढवळ्या संगती

धनी ग जूंपला

चिमण्या चोचींनी

पवळ्या विकला



गाडगे फुटके

औंदाच्या सुगीला

विझल्या चूलीचे

चटके पोटाला



तिरडीच्या दिंडी

हरिनाम सोहळा

पंढरीच्या वाटी

उपाशी कावळा.



- क्लोरोफॉर्म.

प्रस्तावना :
गुलमोहर..माझं आवडतं झाड.
माझ्यासाठी ते निव्वळ एक झाडच नाही तर माझ्याशी संवाद साधणारं एक मोहक अस्तित्व आहे.
माझ्या प्रिय गुलमोहरावर मी लिहलेल्या काही कविता ह्या थ्रेडवर मी पोस्ट करणार आहे.

ध्यानि मनी नसताना.. एका क्षणी.. आयुष्यात मैत्री प्रवेशते...
हिरव्या श्रावणात.. हातावर रंगलेल्या.. मेंदी सारखी..
आयुष्यभर.. आठवत रहाते...!

मैत्री म्हणजे.. एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं...

मैत्री म्हणजे.. कधी कधी.. स्वत:लाच आजमावणं असतं....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघडतं..
हळ्व्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं..

मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं...
' प्रेम '! परमेश्वरानं माणसाला दिलेली.. सर्वात सुंदर गोष्ट !

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'...
मैत्रीतुनच फुलतात नाती.. फुलपाखरासारखी...

इंद्रधनुष्यी रंग लेवुन.. फुलपाखरु आकाशात झेपावते..
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते....

- चंद्रशेखर.

नमस्कार मित्रानो..

एक वेगळ्या विषयावर माझी ही दूसरी कविता. रडवन खुप सोप असत पण हसवन हे खुप कठिन...म्हणुन एक कठिन काम हातात घेउन बघुया म्हणुन माझा एक प्रयत्न... माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो...माझ्या ह्या कवितेने कुणाच्या चेहऱ्यावर स्मित हास्याची एक रेश जरी उमटली तरी हे माझ्या कवितेच यश असेल..



माझ्या ह्या कवितेने कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी त्यांची जाहिर माफ़ी मागतो.आणि त्याना सांगू इच्छितो की त्यांच्या भावना दुखावन्याचा माझा मुळीच हेतु नाही..एक गंमत म्हणुन मी ही कविता केली आहे. तुम्हीही ही गंमती वरच न्यावी ही विनंती..धन्यवाद..



एक वेडा कवी.....



पोरींचे बाप म्हणजे बाप रे बाप..

डोक्याला असतो ह्या साल्यांचा ताप..



पोरींचे बाप म्हणजे बाप रे बाप..

जणू काही फणा काढून उभा आहे साप..



अचानक समोर आला की..

पळून पळून लागते ही धाप..



पोरींचे बाप म्हणजे बाप रे बाप..

नुसता आवाज ऐकला की अंगाचा उडतो हा थरकाप..



सुंदर सुंदर पोरींचे का असतात असे..

असे एकदम यमासारखे दिसणारे हे बाप...



आणि गोऱ्या गोऱ्या पोरींचे असतात....

अगदी कोळश्या सारखे काळेकुट्ट हे बाप..



चायला कधी कधी ह्यांच्या मुळेच..

आमच्या भेटीलाही लागतो चाप....



मला आवडलेल्या सगळ्या पोरींचे साले असेच का असतात बाप...?

न जाणे मागच्या जन्मी मी कोणते केले होते असे पाप..



लांब लांब मिशा ठेउन न जाणे स्वताला काय समजतात...

पण मिशा वाढल्या तर मला हे सगळे वीरप्पन सारखे का दिसतात...?



जा सांग तुझ्या बापाला मिशा वाढवून कुणी वीरप्पन बनत नाही..

ए मुच्छड तुला काय तुझ्या बापाला ही मी घाबरत नाही..



अचानक ही हिम्मत माझ्यात कशी येते मला कळतच नाही...

साला तिचा बाप समोर आला की माझी बोबडी का वळते हे कोडं मला सूटतच नाही..



......एक वेडा कवी.....११ मे २००९

कुणीतरी आकाशाचे रंग

का सारे लुटले होते

काळजात साठलेल्या राखेत

वादळ दबून बसले होते !!



वारा नव्हता , पळाले ढगही

तारेही सारे तुटले होते

मनातल्या मनात ठसठसणाऱ्या

कळांचे पेव फुटले होते !!



हसण्या रडण्याचेही आसतील

तीळ-तीळ मारण्याचेही नियम होते

शिउन नशीब कुठवर पुरवणार

सारे आभाळच इथे फाटले होते !!



oceanheal

10 May 09

पावसाला शोधणाऱ्या वादळाची चूक होती..
प्रेम जे मी समजले ती काळजाची चूक होती....

घरकुल तू वसविले करून मजला पोरके...
सांग मजला काय माझ्या आसवांची चूक होती...?

आलास माझ्या अंगणी सांजेसमवेत जेधवा...
ते तुझे चालणे की पावलांची चूक होती??

अर्पिले मी स्वताला तुझ्या मिठीत ज्या क्षणी..
ते तुझे हासणे की चांदण्याची चूक होती..??

राताराणीच्या कुशीतुनी कालही जी पहिली..
ती तुझीच गोड स्वप्ने की आठवांची चूक होती??

(Rasika 10 may 09)