रडताना किती
बरे वाटते ना
दुख जे हलके
मनातले जे रडू
रडताना किती
बरे वाटते ना
सूर्य झाकेल
जो अंधार
दुखातले जे अश्रु
सुखातले जे हसू
रडताना किती
बरे वाटते ना
पंकज रोकडे

Type rest of post here

रिमझिम अलवार

तुझ्या पैजनिची झंकार

काजळी डोळे

सौंदर्याचा अलंकार

वास्तव की स्वप्न

तुझ लाज लपवून

डोळ्यातून हसण

केसात तुझ्या



मोगरा बहरला असा,

सुगंधात तुझ्या ,

गंध विसरला स्वतचा!

काय म्हणू तुझ सौन्दर्य

कवी असून मजकडे नाही शब्द

वैभव भागवत

लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांची परस्परांवरील टीकेची चिखलफेक संपली. मतदारराजाने आपला कौल दिला आणि त्याचा निकालही स्पष्ट झाला. आता खरं तरं राजकीय पक्षांनी स्वतःच्या कामगिरीचे शांत डोक्‍याने परीक्षण करण्याची गरज आहे. पण महाराष्ट्रातील निकालांवरून एका नव्याच वादाने जन्म घेतला आहे. मराठी माणसाच्या कल्याणाचा मक्ता कोणाचा यावरून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (नेहमीप्रमाणे) जुंपली आहे. थेटपणे सांगायचे, तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी (नेहमीप्रमाणे) झडू लागल्या आहेत. लोकशाही पद्धतीमध्ये कोणत्याही विषयावर सखोलपणे चर्चा होणे अपेक्षितच आहे. पण त्या चर्चेतून उमटणारा सूर हा लोकशाही बळकट करणारा असला पाहिजे. लोकशाही पद्धत मोडीत निघेल, अशा विषयांना कोणीच थारा देऊ नये, हे निश्‍चित.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे राज्यात आणि विशेषतः मुंबईत शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना फटका बसला, असा आरोप गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना करीत आहे आणि त्यालाच मराठी माणसाचा आवाज आता दिल्लीत कोण मांडणार, असा एक भावनिक रंग दिला जात आहे। खरंतर, यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर भारतीय नागरिकांनी केवळ टीकेचे आणि तक्रारींचे राजकारण करणाऱ्यांपेक्षा विकासाचे, संधीचे राजकारण करणाऱ्यांना लोकसभेत पाठविल्याचे स्पष्ट दिसते. म्हणूनच १९९१ नंतर पहिल्यांदाच कॉंग्रेसला देशात २०६ जागांवर यश मिळाले. महाराष्ट्रातील विचार केल्यास राज ठाकरे यांना मिळालेल्या यशामागील अनेक कारणांपैकी हे देखील एक कारण आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे विविध पक्षांच्या नेत्यांवर टीका करीत असत. पण त्याच वेळी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकदा तरी संधी द्या, असे आवाहनही मतदारांना करीत असत. याच आवाहनाचा परिणाम इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम)मधून दिसला, हे उघड आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी शिवसेनेची मते खाल्ली हा शिवसेनेकडून केला जाणारा कांगावा हास्यास्पद आणि त्या पक्षाचे महत्त्व कमी करणारा आहे। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती राज्यातील आणि राज्याबाहेरील मराठी माणसामध्ये नितांत आदर आहे. म्हणून मराठी माणसाच्या बाजूने दुसरे कोणीही उभे राहायचे नाही, मराठीच्या मुद्‌द्‌यावर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा पक्षाने बोलायचे नाही, ही भावना सुरवातीला म्हटल्याप्रमाणे लोकशाही प्रक्रियेला मारक आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या पक्षाच्या पारड्यात सामान्यांनी मते टाकल्याचा इतरांनी द्वेष करण्याचे कारण नाही. कोणत्याही क्षेत्रातील मक्तेदारी ही ग्राहकांसाठी मारकच असते. तसेच काहीसे राजकारणातही आहे. त्यामुळेच मराठीचा मुद्दा हा केवळ शिवसेनेचा नाही. आज राज ठाकरे आहे, उद्या आणखी कोणीतरी हाच मुद्दा घेऊन ग्राहकरुपी मतदारराजापर्यंत गेला, तर त्याला पाठिंबा द्यायचा की नाही, हे महाराष्ट्रातील प्रगल्भ, सज्ञान जनताच ठरवेल. आम्हीच मराठी जनांचे पाईक असे सांगत उमलू पाहणारे एखादे नवे रोप गाडून टाकणे, निश्‍चितच पुरोगामी महाराष्ट्राच्या हिताचे नाही.पुण्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी अत्यंत समंजसपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शिवसेनेने गेले दोन दिवस राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारामुळे (रणजित शिरोळे) माझा पराभव झाला, असे मी म्हणणार नाही. पक्षाच्या ताकदीवरच निवडून आले पाहिजे,'' अशी प्रतिक्रिया शिरोळे यांनी व्यक्त केली होती. शिवसेना नेत्यांनी या प्रतिक्रियेवर विचार करून खरंच आपली ताकद कमी झाली आहे का, याची चाचपणी केली पाहिजे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे परत एकदा तक्रारींचा सूर लावला, तर विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला आणखी झटके बसतील, हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर राज्यात निवडणूक लढविली नसती, तर ती सगळी मते शिवसेनेलाच पडली असती, हा या पक्षाने लावलेला एक जावईशोध आहे. केवळ शिवसेनेच्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात आपली मते टाकली, असे विधान करणे थोडेसे धाडसाचे ठरेल. फक्‍त शिवसेनाच नाही, तर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या पाठिराख्यांनीही आता राज ठाकरे यांच्याकडे आपला मोर्चा वळविला असण्याची शक्‍यता गृहीत धरायला हवी. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीत उतरली नसती, तरी शिवसेनेच्या निकालात फारसा फरक पडला असता, असे वाटत नाही. २००४ मधील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसतानाही मुंबईत शिवसेनेला केवळ एका जागेवर यश मिळाले होते. शिवसेनेच्या मोहन रावले यांनाच निवडणुकीत यश मिळाले होते. मनोहर जोशी, संजय निरुपम (त्यावेळी शिवसेनेकडून निवडणुकीत उतरले होते) यांच्या पदरी अपयशच आले होते.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण आपली गुणवत्ता, वेगळा विचार करण्याची क्षमता, व्यवस्थापन कौशल्य याच्या जोरावर प्रगती साधत असताना राजकीय पक्षांनीही खुलेपणाने मतदारांसमोर जायला काय हरकत आहे? केवळ दुसऱ्याची उणी-दुणी काढून यश मिळणार नाही, त्यापेक्षा वेगळी रणनीती आखणे जास्त गरजेचे आहे, हे शिवसेनेतील सर्व नेते-उपनेते लक्षात घेतील, एवढीच अपेक्षा.http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=79c0d159-7740-43c4-8f79-4947b5cd32ed&SID=725

नवीन ब्लॉग कसा वाटला तुम्हाला जरा संग

तुमच्या प्रतिक्रिया ची मी वाट बघत आहे सो जरुर संग माला कसा वाटला नवीन ब्लॉग अणि ह्या वीक मदेच नवीन कविता येणार आहेत

चैत्र अग्निशिखा पेटवून जातो
अबोलीस गुलमोहर उजवून जातो

लज्जा हिरवी गळते अलवार
लालबुंद तो कटाक्ष चेतवून जातो

रक्तवर्णी पाकळ्या टोचती तनुस
स्पर्श उष्णसा फुलवून जातो

दिन बेभानसे पेटता फुलांनी
रात ठिणग्यांनी सजवून जातो

रात ठिणग्यांनी सजवून जातो
निखारे तो मेघांनी विझवून जातो

भले नाकार सत्य तू स्वप्ना
गुलमोहर तुज सुलगवून जातो

- स्वप्ना

पावबरोबर लावून खाल्ले अ'मूळ बटर ...
पावबरोबर लावून खाल्ले अ'मूळ बटर .......
निखिल रावांचे नाव घ्यायला अ'ड लेय माझे खे ट र......

" उदास " मी , त्यात काय नविन आहे जगायचे ती गेली तेंव्हाच थांबले आहे
उराताली भावना पापण्या आड़ आजही लपते

" बर झाल ती गेली ते "