गुळाचा गणपती : Pu La Deshpande

बटाट्याची चाळ : गच्ची सर झालीच पाहिजे: Pu La Deshpande

बटाट्याची चाळ : भ्रमण मंडळ : Pu La Deshpande

असा मी असा मी : Pu La Deshpande

अंतु बर्वा : Pu La Deshpande

”…तुम्ही तिथं आलात, की कुणालाही विचारा… अगदी शेंबडं पोरसुद्धा सांगेल या नानाचा पत्ता…”एवढं बोलून नानांनी फोन ठेवला आणि पाहुण्यांची वाट पाहू लागले. दुपार उलटली… संध्याकाळ झाली तरी पाहुण्यांचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजले आणि फोन खणाणला. फोनवर पाहुणेच बोलत होते-
”तुम्ही सांगितलं तिथं येऊन दुपारपासून प्रत्येकाला विचारतोय हो, पण कुणालाही तुमचं घर माहीत नाहीए हो…”
”बरं बरं, असू दे… आत्ता तुम्ही कुठे उभे आहात तेवढं सांगा…”
”संपर्क एसटीडी बूथ.”
”अगदी बरोब्बर आलात बघा. त्या एसटीडी बूथची पाटी आहे ना, त्याच्या वरची खिडकी आमचीच. शेजारच्या जिन्यानं सरळ वर या… पहिल्या मजल्यावरचं पहिलंच घर… कुणीही सांगेल…!”

गोविंदराव खरेदीला गेले की कुठलीही वस्तू असो, ती पाहून झाली की ते विक्रेत्याकडे आग्रह धरीत- मला पॅक पीस हवाय! एके दिवशी गोविंदराव दुपारी एकटेच घरी असताना दारावरची बेल वाजली. गोविंदरावांनी दरवाजा उघडला. दारात हसतमुख चेहऱ्याने एक रुबाबदार तरुण उभा. गोविंदरावांनी काही विचारायच्या आतच त्याने पोपटपंची सुरू केली- “सर, आमच्या डायमंड वॉचेसतर्फे फक्त आजच्या दिवस तुमच्यासारख्या काही खास लोकांसाठी एक स्पेशल स्कीम- एका लेडीज वॉचवर पुरुषांसाठी एक घड्याळ फ्री… आणि तेही सवलतीच्या दरात!” आणि त्याने लगेच दोन चकचकणारी घड्याळे गोविंदरावांच्या हातावर ठेवली.
नेहमीप्रमाणे गोविंदरावांनी घड्याळे नीट निरखून पाहिली आणि विचारले, “केवढ्याला?”

“तशी एमआरपी दोन हजार रुपये आहे, पण आज आम्ही ती दोन्ही देत आहोत फक्त हजार रुपयांत!”

“ठीक आहे, पण मला पॅक पीस हवाय!”

“यस सर, पॅक पीसच देतो आणि खास तुमच्यासाठी कंपनीने केलेला गिफ्ट पॅकच देतो. वहिनी आल्या की थेट त्यांच्या हातीच द्या गिफ्ट पॅक फोडायला, बघा त्या किती खूष होतील तुमच्यावर!”

केवळ कल्पनेनेच गोविंदराव आनंदले आणि घाईघाईने त्यांनी पाचशेच्या दोन नोटा देऊन तो गिफ्ट पॅक ताब्यात घेतला. संध्याकाळी मोठ्या थाटात त्यांनी तो गिफ्ट पॅक पत्नीला दिला. मालतीबाईंनीही अलगद कागद उलगडून गिफ्ट पॅक उघडला. आत दोन घड्याळे होती. हुबेहुब विक्रेत्याने दाखवली तशीच… पण खेळण्यातली!

रिपोटर्स द्वारे हे माहिती हो‍ते की घरा‍त इंटरनेटचा वापर करणार्‍या मुलांची संख्या दरवर्षी वाढ‍ते आहे. तंत्रज्ञानाने परिचित असणे चांगली बाब आहे पण ह्याचे काही नुकसान देखील आहे. रिपोर्ट्स प्रमाणे घरात इंटरनेटचा वापर करणार्‍या मुलांची संख्या वाढते आहे. नेटची माहिती असणे उत्तम गोष्ट आहे, पण ह्याच्या कमी स्पष्ट आहे.

ऑनलाइन दुर्घटनेतून वाचण्याच्या काही युक्त्या आहेत:

  • जर आपल्याला संशय असेल की आपली मुले जोखमीचे ऑनलाइन व्यवहार करित आहे, तर आपण त्यांच्या द्वारे पोस्ट केलेली माहिती पाहण्यासाठी त्यांच्या द्वारे पाहिलेली वेबसाइट शोधू शकता.
  • गुप्त नीतिचे मूल्यांकन करा. अनेक वेबसाइट आपल्या ईमेल पतत्या सारखी माहिती इतर कंपन्यां बरोबर वाटू शकतात जे आपल्याला स्पॅम आणि स्पायवेअर सारख्या वस्तू देखील पाठवू शकतात.
  • कम्प्यूटरला नेहमी भोजन गृह किंवा फॅमिली रूममध्ये ठेवा, जिथे आपण मुलांद्वारे बघितल्या जाणार्‍या वेबसाइटवर लक्ष ठेऊ शकाल
  • आपल्या मुलांबरोबर इंटरनेट वापरण्याचा प्रयत्न करा.
  • आपल्या मुलांना शिक्षित करा:
  • आपल्या मुलांना अनोळखींशी चॅट करण्याचे धोके सांगा, जरी हे ऑनलाइन होत असेल.
  • त्यांना समजवा की ऑनलाइन मित्रांना भेटणे सुरक्षित नसते.
  • त्यांना प्रोत्साहित करा की जर त्यांना कुणाची भीती वाटत असेल, तर आपल्याला सांगावे.

ऑनलाइन चॅट वार्तालाप

ऑनलाइन सर्फर अनोळखींशी ऑनलाइन भेटतात आणि कोणतीही संधी न देता त्यांना भेटण्यास सहमत करतात. मुलांना विशेषकरुन किशोरांना यापासून सावध करायला हवे, कारण कोणीही अनोळखींपासून निश्चिंत नाही आहे.


चॅट वार्तालाप वार्तालाप एन्क्रिप्टेड

जॅकी अरे, आहेस का

स्वीटी अरे

जॅकी ASL? वय, लिंग, स्थान (Age, Sex, Location)

स्वीटी 21, F, मुंबई. ASL? स्त्री, 21 वर्ष

जॅकी 22, M, मुंबई

तुमचे नाव ‘छान’ आहे:)

”मी तिच्याकडे एकटक पाहायचो…”
”आणि ती?”
”तीही माझ्याकडे पाहायची…”
”काय सांगतोस!”
”…तसा मला भास व्हायचा.”
”अच्छा!”
”ती मला खूप आवडायची.”
”आणि तिला?”
”तिलाही मी खूप आवडायचो…”
”खरंच!””हो, असं मला वाटायचं.”
”मग प्रॉब्लेम काय झाला यार?”
”माझं तिच्यावर नितांत प्रेम होतं, हे त्रिकालाबाधित सत्य होतं…”
”मग?”
”पण… एक कटुसत्यही होतं.”
”काय?”
”मी तिला अजिबात आवडत नव्हतो आणि तिचं माझ्यावर तसूभरही प्रेम नव्हतं!”
”अरेरे….!”

रीटा आणि मुक्ताची आयुष्याच्या जोडीदारासंबंधी चर्चा सुरू होती-”काय
, राजू की संजू? कोणाची निवड करणारेस?”
”कोणाचीच नाही!”
”का गं, बिच्चारा राजू तर तुझ्या कित्ती पुढे-पुढे करीत असतो.”
”म्हणूनच, असा पुढे-पुढे करून थुंकी झेलणारा शेळपट जोडीदार मला नकोय!”
”आणि संजू? तो तर तुझ्या कित्ती मागे लागलाय, तू जिथे जातेस तिथं असतो.”
”…असा सतत मागे-मागे राहून गोंडा घोळणारा वेडपट तर अजिबात नको!”

पहिला - आता मी पक्कं ठरवून टाकलंय!
दुसरा - काय?
पहिला - जर का मला पुढचा जन्म मिळाला…
दुसरा - तर?
पहिला - तर लग्न करण्यापूर्वी मी किमान दहादा विचार करीन…
दुसरा - आणि…पहिला - आणि किमान शंभर मुली
पाहीन…. आणि मुक्या मुलीशीच लग्न करीन.
दुसरा - अरे पण का?
पहिला - कारण, या जन्मातली माझी बायको एवढी बोलते.. एवढी बोलते… एवढी बोलते…की मी पार मुका होऊन जातो आणि मला असं वाटतं, की मी बहिरा असतो तर किती बरं झालं असतं!

खूप वर्षांनी भेटलेल्या दोन मित्रांचा कॉफीशॉपमध्ये संवाद चालू होता.
”तुला सांगतो, कॉलेजात असताना माझी काय वट होती.
कॉलेजच्या गेटवर जरी माझं नाव सांगितलं तरी कुणीही माझ्यापर्यंत येऊन पोचत असे.”
”मग तुला खूप मुली ओळखत असतील नाही!”
”अरे, मुली तर माझी ओळख करून घेण्यासाठी ध़डपडायच्या…”
”काय सांगतोस’?”
”खरंच सांगतोय यार…”
”पण एवढ्या मुलींशी ओळखी असूनही वयाची चाळिशी तू ओलांडलीस तरी अजून तुझं लग्न कसं झालं नाही?”
”तेच तर दुःख आहे यार, कॉलेजात दर रक्षाबंधनाला माझे दोन्ही हात राख्या बांधायला पुरायचे नाहीत, पण फ्रेंडशिप डेला तेच माझे दोन्ही हात चक्क ओस पडायचे रे….!”

उडपी संतोष भुवनसमोर चकाचक आणि अत्याधुनिक डायनिंग हॉल सुरू झाला. संतोष भुवन ओस पडू लागले. माश्या मारत बसलेला उडपी वैतागून आपल्या मित्राला म्हणाला, ”काय करावं हेच कळत नाही. समोरचा डायनिंग हॉल सुरू झाल्यापासून कुणी माझ्या हॉटेलात फिरकतच नाही रे…”
मित्र म्हणाला, ”समोरच्या डायनिंग हॉलचं नाव काय आहे म्हणालास?”
”आनंदी डायनिंग हॉल.” उडपी उत्तरला.”अरे मग तू बार सुरू कर - दुःखी रेस्टॉरंट अँड बिअर बार!”

रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…

दारू ढोसल्याशिवाय सदाचा एक दिवसही पार पडत नव्हता. त्या दिवशी मात्र कमालच झाली. घरी पाहुणे आल्याने दिवसभर त्याने संयम पाळला. रात्रीची जेवणे झाली. पाहुणे गेले. दाऱूचा एकही पेग न घेता आपला नवरा आज जेवला हे पाहून सदाच्या बायकोलाही समाधान वाटले. त्याच आनंदात ती म्हणाली, ”अहो जा, थोडी बडीशेप तरी तोंडात टाका.”बडीशेप आणायला गेलेला सदा तासाभराने आला तो झिंगतच.”

का हो?” बायकोने विचारले.”काय करणार, वेटर म्हणाला की फक्त बडीशेप देता येणार नाही. कमीत कमी एक पेग तरी घ्या म्हणजे बिलाबरोबर बडीशेप देतो. मग काय….”
सदाच्या बायकोने कपाळाला हात लावला.

दारूच्या दोन बाटल्या आडव्या झाल्यावर सदा आणि मध्या चांगलेच रंगात आले.
”यार मध्या, मला कधी कधी वाटतं ना की समाजासाठी काही तरी केले पाहिजे यार.” सदा म्हणाला.
”मग करू की” - मध्या म्हणाला.
”पण काय करणार यार?”
”अरे, उद्या गांधी पुण्यतिथीनिमित्त आपल्या कॉलनीत रक्तदान शिबिर आहे, तिथंच रक्तदान करू.”
”अरे ते तर आपण मागच्या वर्षी पण केलं होतं!”
”हो, मग या वर्षी पण करू, तेवढंच पुण्य गाठीला.”
दुसऱ्या दिवशी दोघेही मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात संयोजक आला व म्हणाला, ”सॉरी,
तुम्हा दोघांना रक्तदान करता येणार नाही.”
”का?” दोघेही एकसुरात म्हणाले.”
कारण मागच्या वर्षी तुम्ही दोघांनीही दिलेल्या रक्तात रक्तघटकांऐवजी फक्त अल्कोहोलच निघालं!”

बायको - अय्या, पाहा ना, कित्ती छान आहे नाही…

नवरा - वा! छानच… सुंदर!

बायको - बघा ना, काळा रंगसुद्धा किती गोड दिसतो नाही.

नवरा - ऑ, काळा रंग?

बायको - हो!

नवरा - अगं, एवढ्या गोऱ्यापान, देखण्या स्त्रीला तू काळी म्हणतेस?

बायको - अहो, मी तिच्याबद्दल नाही, तिच्या साडीविषयी बोलतेय.

नवरा - अरेरे, आणि मी त्या ललनेबद्दल….!

बायको - रोखून काय पाहताय, चला…

बायको - रोखून काय पाहताय, चला…

शिक्षकांच्या खोलीत गणिताचे शिक्षक विज्ञानाच्या शिक्षकांना म्हणाले, ”गणितात मी एवढा हुशार, पण पगाराचं उत्पन्न आणि घरखर्च यांचं समीकरण काही केल्या जमत नाही.”त्यावर विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, ”घरखर्चाच्या गणिताचं काय घेऊन बसलात सर, अहो ‘जोड्या लावा’ या प्रश्नात माझा हातखंडा, पण माझ्या आयुष्यात मात्र मला स्वतःची योग्य जोडी नाही लावता आली हो…”

गाईड - ती पाटी पाहा - ‘वेड्यांचे हास्पिटल’.आशिया खंडातले हे सर्वांत मोठे वेड्यांचे हॉस्पिटल आहे.
पर्यटक - अरेच्चा!… कमाल आहे! हे कसं शक्य आहे?
गाईड - का हो?
पर्यटक - अहो, मागच्या ट्रिपला मी इथे आलो, तेव्हा तर इथे पाटी होती…
गाईड - कोणती?
पर्यटक - ‘हा-हा-ही हास्यक्लब’…. !

प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?

प्रेयसी - काय करशील?

प्रियकर - तू सांगशील ते करीन!

प्रेयसी - मग आधी नोकरी कर.

प्रियकर - का?

प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

प्रियकर - एकमेकांच्या सहवासात किती हलके हलके वाटते ना!प्रेयसी - हो ना रे राज्जा! अगदी गॅसच्या फुग्यांप्रमाणे….प्रियकर - असं वाटतं, की असंच प्रेमाच्या आकाशात वर वर जाऊन स्वर्गसुखाचा आस्वाद घ्यावा.प्रेयसी - हो ना!… पण लग्न झाल्यानंतर हा प्रेमाचा गॅस संपला तर…प्रियकर - लग्न झाल्यानंतर तू फक्त स्वयंपाकाची चिंता कर, गॅसचं मी पाहून घेईन!

प्रेयसी - राजा, तुझ्या घरी काय काय आहे रे?

प्रियकर - सर्व काही आहे राणी!

प्रेयसी - म्हणजे नेमकं काय काय आहे?

प्रियकर - अगं फोर व्हिलर, टू व्हिलर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन…

प्रेयसी - अजून?

प्रियकर - होम थिएटर, ओव्हन, कुलर…

प्रेयसी - आणखी काही?

प्रियकर - फूड प्रोसेसर, गॅस गिझर…

प्रेयसी - छान! पण तुझ्या घरी कोण कोण असतं रे?

प्रियकर - मला कुणीच नाही. आई होती, तीही सहा महिन्यांपूर्वीच देवाघरी गेली. पण तिची आठवण म्हणून तिचे दागिने मी कपाटात जपून ठेवले आहेत.

प्रेयसी - वा! फारच छान!!

प्रियकर - राणी, लग्न झाल्यावर तू माझ्यासाठी काय काय करशील गं?
प्रेयसी - राजा, सारं सारं करील रे!
प्रियकर - म्हणजे नेमकं काय काय करशील?
प्रेयसी - समजा, दिवसभर काम करून तुझे हातपाय दुखले, तर मी ते चेपून देईल!
प्रियकर - डोकं दुखलं तर…प्रेयसी - दाबून देईल!
प्रियकर - पण समजा, दिवसभर तुझ्याशी भांडून भांडून माझा घसा दुखला तर….?
प्रेयसी - तर मी तुझा गळा दाबीन!!!

ताटात कारल्याची भाजी पाहुण पतिराजांनी नाक मुरडले. मालतीताई चिडल्याच. तणतणत म्हणाल्या ” सोमवारी कारलं चाललं, मंगळ्वारी - बुधवारीही तुम्ही काही बोलले नाही. गुरुवारी तर मी डब्याल्याही दिली होती. मग आजच ( शुक्रवारी ) काय झाले हो नाक मुरडायला?

‘मुलगा वारंवार गॅरहजर राहतो’ या कारणासाठी मुख्याधापकानी हॉलिवुड मधील एका अभिनेत्रिला भेटायला बोलावले. ‘बाई तुमचा मुलगा फारवेळा कारण न देता गॅर्हजर राहतो, याचे काही स्पष्टीकरण देउ शकता का?’ यावर ती अभिनेत्री म्हणाली, ‘काय करणार सर, माझ्या लग्नाला तोहजर नसेल तर ते वाईट दिसेल ना? त्यामुळे त्याला नाईलाजाने शाळा बुडवावी लागती. ‘

एका कोर्टात पत्नी विरूध्द घटस्फोटाची केस चालू असते. पतीचे वकील तिला विचारतात की, तू तुझ्या पतीची फसवणूक केली काय?
पत्नी सांगते : मुळीच नाही, उलट पटीनेच माझी फसवणूक केली. दौरवरून तीन दिवसात परत येतो म्हणून सांगितले व पहिल्याच दिवशी रात्री १२.०० ला ते परत आले. ही माझी फसवणूक नाही का?

एका कोर्टात पत्नी विरूध्द घटस्फोटाची केस चालू असते. पतीचे वकील तिला विचारतात की, तू तुझ्या पतीची फसवणूक केली काय?
पत्नी सांगते : मुळीच नाही, उलट पटीनेच माझी फसवणूक केली. दौरवरून तीन दिवसात परत येतो म्हणून …

संता बार मध्य मध्ये दारू पिता पिता रडात बसला होता. बंता ने विचारले, ‘काय झाले?’
संता म्हानाला, ‘अरे जिचा विसर पडावा म्हणुन दारू ढोसतोय, त्या पोरीचे नाव आठवत नाहिये यार!!!’

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, तेव्हा ती सांगते, “अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते.”नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत …

बंता : काय रे तू तर डॉक्‍टरला भेटायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले.संता : अरे यार उद्या जाईल, आज थोडी तब्ब्यत खराब आहे.

वो आये मेरे सामनेसेलचकते…. बलखाते… मचलते…..वो आये मेरे सामनेसेलचकते… बलखाते…. मचलते…. इतराते……और आकर दबे होठोंसे बोले………………भाकर वाढा दादा !!!!!!

फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..
दुसरा : बोला.
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, ते ‘पावन खिंडीत’ लढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी …

म्हातारं झाल्यावर प्रथम माणूस नावं विसरतो, मग चेहरे विसरतो. पुढे तो आपली पॅंटची चेन वर ओढायला विसरतो आणि शेवटी पॅंटची चेन खाली करायलाही विसरतो.

म्हातारं झाल्यावर प्रथम माणूस नावं विसरतो, मग चेहरे विसरतो. पुढे तो आपली पॅंटची चेन वर ओढायला विसरतो आणि शेवटी पॅंटची चेन खाली करायलाही विसरतो.

आज सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरने मोठे आणि चांगले मुर्खातल्या मुर्ख माणसांनाही चालवता येतील असे प्रोग्रॅम लिहिने आणि या जगाने मोठे आणि चांगले मुर्खातले मुर्ख माणसं तयार …

मी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकतो, माझ्या अनियंत्रित मनाला सोडून

भारतीय टपालखात्याच्या अजबगजब कारभारामुळे कुणा वाचकाने लोकसत्तेस पाठविलेले पत्र चुकून आमच्या पत्त्यावर आले. आता लोकसत्तेस रोज एवढी पोतेभर पत्रे येतात. (आणि यात अतिशयोक्ती नाही! अन्य पत्रांनी वाईट वाटून घेऊ नये.) त्यात या पत्राची दखल घेतली जाईलच असे नाही, असे वाटल्याने आम्हीच ते येथे प्रसिद्ध करीत आहोत. कारण की पत्र मोठेच उद््बोधक आहे!! अलीकडेच रा. रा. बापू आत्रंगे यांनी लोकसत्तेच्या मुखपृष्ठाच्या किरकोळीकरणाबद्दल लिहिले होते. त्या वाक्याच्या स्मृतींना हे वाचकपत्र धादांत अर्पण…

——————————————
प्रिय संपादक, लोकसत्ता, मुंबई
विषय - लोकमानस या सदराकरीता लेख.
महोदय,मी आपल्या पेपरचा खूप वर्षांपासूनचा वाचक आहे. आमच्या नगरसेविकेने आमच्या वॉर्डात एक पेपरचे वाचनालय सुरू केले आहे. ते आता बंद पडले. पण तेथील सगळे पेपर आता शाखेत पडतात. मी तेथे जाऊन तुमचा पेपर रोज वाचतो. मला तुमचे सगळे लेख खूप आवडतात. मी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंतचे सगळे अग्रलेख आवडीने वाचतो. बातम्यासुद्धा वाचतो.
तुमचा पेपर वाचून आम्हांस खूप नवीन नवीन माहिती मिळते. ती माहिती खूप उपयोगी असते. काही दिवसांपूर्वी तुम्ही सारेगमची हेडलाईन छापली होती. ती आम्हांला खूप आवडली कारण की आम्हांला ती मालिका खूप आवडते. आमच्या घरातील सगळेच जण ती मालिका पाहतात. गायिका लता मंगेशकर यांनी मुलांना आर्शिवाद दिला ते आम्हांला खूप आवडले. कारण की लता मंगेशकर यांच्या कॅसेटी आम्ही आवडीने ऐकतो व त्यांची गाणीसुद्धा ऐकतो. आम्हांला लता मंगेशकरांचे बाबा आणि बाळ हे सुद्धा आवडतात. त्या लहान लहान गायकांना भेटल्या ही बातमी खूप महत्वाची आहे, असे आमच्या खात्यात सगळेच म्हणाले. मी गोदरेज कंपनीत शिक्युरिटीत आहे. माझ्या कुटुंबाने सारेगमला आरया आंबेकरला चार एसेमेस पाठविले आहेत. तसेच आजची बिग बॉसची बातमीपण आम्हांला खूप आवडली. आम्ही ती मालिकापण पाहतो. पण त्याच्यापेक्षा आम्हाला चार दिवस सासूचे ही मालिका खूप आवडते. तिची हेडलाईन तुम्ही कधी छापणार याची वाट आम्ही पाहतो आहोत.
बिग बॉसच्या घरातील भाडेकरू पळून गेले हा सिक्युरिटीला मोठा धक्का आहे. सिक्युरिटी टाईट पायजे होती. आमच्या कंपनीत सिक्युरिटी एकदम कडक आहे. (कृपया हे वाक्य काटू नका. महत्वाचे आहे.)संपूर्ण देशातील सिक्युरिटीचे कसे बारा वाजले आहेत, हे तुमच्या बातमीमुळे सगळ्यांना कळले. देशाला दहशतवादाचा धोका आहे, हे पण बिग बॉसच्या बातमीमुळे कळले. याच्यावर तुम्ही एक सणसणीत अग्रलेख लिहा. काहीकाही मालिका लई लांबवित्यात. त्याच्यावरपण बातमी करायला जमली तर पाहा, कारण की त्याच्यामुळे मालिकांतला इंटरेस संपून जातो. हे समाजासाठी चांगले नाही.
चार दिवस सासूचेमधील मुख्यमंत्री कसे पण वागतात. एकदा त्यांचीपण बातमी छापा. तसेच असंभव सुलेखाला अटक झाल्यावर तिची नार्को चाचणी करण्याची गरज आहे, अशीपण बातमी छापा. ते फार महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक खुन उघडकीस येतील.
मला तुमचे अग्रलेख खूप आवडतात. म्हणून कृपया माझे हे पत्र पहिल्या पानावर ठळक बातमी म्हणून छापणे, ही विनंती.चुकलं माकलं माफ करा. थोडं लिहिलं जास्त समजा.
कळावे,तुमचा नम्र वाचक.
(Thanks to चांगदेव पाटील,(Baatmidar Blog), दि. १८ नोव्हेंबर २००८)

श्री. प्रमोद मुतालिक यांची सुटका केल्यानंतर `सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद…

प्रतिनिधी : पबमध्ये हल्ला केल्याने काय परिणाम झाला ?
श्री. प्रमोद मुतालिक :
१. असभ्य व गैरवर्तन करणार्‍या हिंदु मुलींना चाप बसला. आता त्या पबमध्ये जाण्यास व असभ्य वर्तन करण्यास घाबरतील. संस्कृती रक्षणाचे हे कार्य संपूर्णपणे यशस्वी झाले. मुलींचे पबमध्ये जाणे थांबवले पाहिजे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सौ. निर्मिला व्यंकटेश यांनी स्वत: म्हटले होते.
२. आतापर्यंत आमचे कार्य कर्नाटकपर्यंत सीमित होते. आता या संस्कृतीच्या अभिमानी कृतीमुळे आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. माझ्या अटकेमुळे उत्तरप्रदेश, दिल्ली, कोलकाता, विजयवाडा, भोपाळ येथे सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. श्रीरामसेनेला राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व प्राप्‍त झाले आहे. राष्ट्रभर याविषयी चर्चा सुरू झाली.
३. कर्नाटकचे मुख्यमंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री यांना पबसंस्कृतीच्या विरोधात प्रतिपादन करावे लागले.
४. मंगळुरूच्या या घटनेने हिंदु संस्कृती वाचवण्याविषयी चर्चा सुरू झाली.

प्रतिनिधी : कर्नल पुरोहित व तुमचे काय संबंध आहेत का ?
श्री. प्रमोद मुतालिक : कर्नल पुरोहित व मालेगाव बाँबस्फोट यांच्याशी काहीएक संबंध नाही.

प्रतिनिधी : पुढचे नियोजन काय ?
श्री. प्रमोद मुतालिक : संघटनेचे राष्ट्रीयकरण करणे, सर्व हिंदु संघटनांना संघटित करणे व हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हेच कार्य आम्ही आगामी काळात जोराने करणार आहोत.

प्रतिनिधी : तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे का ?
श्री. प्रमोद मुतालिक : भाजपचे माजी उपाध्यक्ष व राजकारणातून काही वर्षांपूर्वी संन्यास घेतलेले श्री. गोविंदाचार्य व त्यांची संघटना आमच्या पाठिशी आहे. पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनाही आमच्या संपर्कात आहेत.

प्रतिनिधी : कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती ?श्री. प्रमोद मुतालिक : कर्नाटक पोलिसांनी माझ्यावर हजार खटले भरले, तरी हिंदुत्वाचा लढा आम्ही थांबवणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसवरील नाराजी तसेच मराठ्यांचे आरक्षण अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठीतील नेमका तपशील कळू शकला नसला तरी, भविष्यात शिवसेनेची राज्यात सत्ता आणण्यासाठी भुजबळांना गळाला लावण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून झाल्याचे कळते.रात्री नऊच्या सुमारास भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गाड्या नियोजित भेटीनुसार 'मातोश्री'वर धडकल्या. शिवसेना सोडल्यानंतर सुमारे १६ वर्षांनंतर भुजबळांचे 'मातोश्री'ला पाय लागले. त्यांच्यासोबत पुत्र पंकज, पुतण्या समीर आणि इतर कुटुंबातील सदस्य होते. भुजबळ कुटुंबियांचे स्वागत उद्धव, रश्मी ठाकरे यांनी केल्यानंतर भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. याआधी बऱ्याचदा फोनवरून बोलणे झाले असले तरी शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच भुजबळ मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले. यावेळी भुजबळांनी पुष्पगुच्छ देवून बाळासाहेबांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजळा मिळाला. राष्ट्रवादीतील भुजबळ यांच्या सध्याच्या स्थानाविषयीही चर्चा झाली. तेलगी प्रकरणानंतर भुजबळांना राष्ट्रवादीने वळचणीत टाकले होते. मात्र मधल्या काळात 'मातोश्री'शी सख्य वाढल्याने त्यांना पुन्हा पक्षात वरचे स्थान मिळाल्याविषयी यावेळी चर्चा झाली. मराठ्यांचे आरक्षण ओबीसींच्या कसे मुळावर येणार आहे, याचा पाढा भुजबळ यांनी यावेळी वाचला. राणे यांचे नेमके काय होऊ शकते याविषयी देखील भुजबळ यांचे आडाखे बाळासाहेेबांनी यावेळी जाणून घेतले. लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फारशी ताकदीची गरज नसली तरी विधानसभा निवडणूकांच्या आधी भुजबळ सेनेत आले तर काय होईल याविषयी देखील चर्चा झाल्याचे कळते. अर्थात भुजबळ यांनी यावेळी स्वत:कडून कोणताही शब्द दिला नसल्याचे कळते.शिवसेना नेते अंधारात!शुक्रवारी रात्री खासदार मनोहर जोशी यांच्या 'ओशियाना'तील घरी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जोशी अशी एक बैठक झाली. मात्र भुजबळ भेटीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शनिवारी सकाळी 'मातोश्री'वर संजय राऊत, सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे अशी एक बैठक झाली. मात्र यावेळी देखील या नेत्यांना रात्री भुजबळ घरी येणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.

गेले सहा महिने अवघ्या महाराष्ट्राच्या कानांचे प्राण बनलेल्या 'सारेगमप लिटल चॅम्प्स'च्या रविवारी सायंकाळी रंगलेल्या महाअंतिम फेरीत पाच ताऱ्यांमधून आळंदीच्या कातिर्की गायकवाड हिने महागायिका बनण्याचा किताब मिळविला.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तमाम रसिकजनांच्या मनातले ताइत ठरलेल्या या 'पंचम' स्वरांमधून 'झी'च्या सारेगमप स्पधेर्तील महागायकाची निवड ही महाकठीण गोष्ट होती. अखेर महाअंतिम फेरीतून परीक्षकांनी एकमताने कातिर्कीच्या गळ्यात महागायिकेची माळ घातली. या पाच ताऱ्यांवरील रसिकजनांच्या अलोट प्रेमाची एसएमएसरूपी मोजदाद जाहीर न करण्याचे औचित्य आयोजकांनी दाखविले. कातिर्कीबरोबरच प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि आर्या आंबेकर या चौघांनीही महाअंतिम फेरीची लज्जत उत्तरोत्तर वाढतच ठेवली.गोरेगावच्या एसआरपी ग्राऊंडवर रंगलेल्या या सोहळ्यासाठी रसिकांनी तुडुंब गदीर् केली होती. या पाचही गायकांची निवड करणारे, गाण्याची लज्जत अनुभवणारे दिग्गज कलाकार, संगीतकार, अभिनेते यांची मांदियाळीच जमली होती. कातिर्कीला दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. तर अन्य चौघा महागायकांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या बक्षिसाने गौरविण्यात आले. परीक्षक अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांच्या हस्ते ट्रॉफी व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांच्या स्वरूपातील बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले. 'झी'तफेर् संगीत शिक्षणासाठी प्रत्येकास दोन लाख रुपये इतकी रक्कमही यावेळी देण्यात आली.आशा खाडिलकर, संजीव अभ्यंकर, देवकी पंडित, श्ाीधर फडके, सुरेश वाडकर या मान्यवर परीक्षकांची पारख आणि ५० टक्के एसएमएसचा कौल यांच्यावर या महाअंतिम विजेते ठरले. सहा महिन्यांच्या या सूरमयी प्रवासाचे ऑडिओ-व्हिडिओ सीडी संच तसेच 'पंचरत्न' हा आल्बम रसिकांसाठी येणार आहे........आम्ही पाचही विजेते...' या यशावरच थांबू नका, असे सांगत शास्त्रीय संगीताचा पाया मजबूत करण्याचा सल्ला श्रीनिवास खळे यांनी दिला. कातिर्कीनेही 'विजेती मी एकटी नाही. आम्ही पाचही जण विजेते आहोत', असे म्हणत स्पधेर्त वेळोवेळी व्यक्त झालेल्या भावनेचाच पुनरुच्चार केला.

मुशर्रफ - जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मिलीटरी वाल्यांनी 51 तोफा चालवल्या होत्या. बंता - कमाल झाली ... सगळ्यांचा निशाना कसा चूकला?

मिस कॉल एका सरदाराला एकदा कुणीतरी मिस कॉल केला. सरदाराने त्या मोबाईल नंबरवर फोन केला , '' अरे दोस्ता तुला माहित आहे... तुझ्या मोबाईलची बॅटरी संपलेली दिस्ते. ''

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.


प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.

उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांनासंत तुकाराम म्हणून ओळखत.

प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त
असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो

चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात

जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास—- उत्तर- ग्लास काळा होईल

1) क्रुपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पड्तात. चव बिघडते. 2) धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा…..
3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका
4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा… वाजवण्यासाठी नव्हे.
5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा….
7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
8)येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल…
9)येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल.

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….