सुख दुःखाचे फेरे चुकवण्यासाठी
आपण राहावे जन्म भरचे योगी ,
जगताना फक्त सुखाची अपेक्षा करणारे
आपण सर्वच असतो अगदी वेडे भोगी .......

ईशान .

मी संत नसे, न वैरागी
प्रपंचाचा, एक भोगी..
लुटण्या आनंद सुखाचा
मनुष्य मात्र, न मी योगी..

-- संदेश

सारखच मिळालं सुख
तर मन कठोर होईल का?
आलेच मध्येच दुख
तर त्याला पचवता येईल का?


अभी

फुलाचे उमलणे कसे ,
नेहमीच नित्य नवे असते
तसे तुला माझ्याकडे येण्यास ,
काही न काही कारण हवे असते ...