बापावर एक कविता लिहतो
माझ्या मनात विचार आला
माझाच बाप नजरेसमोर
कधी नव्हे तो मी धरला
माझा बापच नेहमी मला
माझा कट्टर शत्रु वाटला
म्हणून त्याच्या स्तुतीत एकही
शब्द कधी सहज नाही लिहला
माझा बापच इतरांच्याही
बापांचाही एक आदर्श ठरला
बाप असावा तसाच माझा
बाप नजरेत माझ्या झाला
बाप फक्त बाप सदाच असतो
म्हणून आपण कमी लेखला
आई पुढेच महानतेला
त्याच्या आपण कमी तोलला
बापच सदैव उपेक्षित तो
साहित्यातही कसा राहिला
झालेळ्यांना बाप कदाचित
बापच अजुन नाही कळला
कवी
निलेश बामणे