यूट्यूबवर आजकाल अनेक टीव्ही सिरियल्स आणि मूव्हीज अपलोड केल्या जातात. अमेरिकन, ब्रिटीश आणि भारतीय प्रॉडक्शन हाऊसेस याकडे एक प्रमाोशनल अॅक्टीव्हिटी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे फॉक्स सर्चलाईट, कोलंबिया पिक्चर्स आदींचे स्वतंत्र यूट्यूब चॅनेल्सही आहेत. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, फॉक्स हिस्टरी आदी चॅनेल्सवरील गाजलेल्या सिरीजही तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. पण यूट्यूबवर पाहायचं म्हणजे तुम्हाला अॉनलाईन राहावं लागतं. शिवाय तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर ‘लो’ किंवा असेल त्या रिझॉल्यूशनमध्ये संबंधित व्हिडीओ पाहायला लागतात. हे व्हिडीओ हाय-डेफिनिशनमध्ये उपलब्ध असल्यास तुम्ही ते आहे तसे डाऊनलोड करून थेट टीव्हीवर पाहू शकतायूट्यूबवरील व्हिडीओ एचडी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही यूट्यूब डाऊनलोडर एचडी या सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. विंडोज अॉपरेटिंग िसस्टिम (95/98/Me/2000/XP/2003/Vista) वर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येऊ शकते. यूट्यूबवर एचडी फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिडीओची लिंक तुम्ही यूट्यूब डाऊनलोडर एचडीमध्ये पेस्ट केली की संबंधित व्हिडीओ एफएलव्ही, एव्हीआय, एमपी४ (आयपॉड कम्पॅटिबल) किंवा एव्हीआय एचडी फॉरमॅटमध्ये सेव्ह करून घेऊ शकता.यूट्यूब डाऊनलोडर एचडी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
यूट्यूबवरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठीच्या आणखी एका सेवेची माहिती वाचाः झटपट डाऊनलोड

0 comments

Post a Comment