वाटते लिहाविशी
एक कविता छान,
शुभ्र आकाशात जशी
इंद्रधनुची कमान,
निर्मळ झार्यामध्ये
जसे खळाळते पाणी,
माझ्या कवितेची असावी
तशी मधाळ वाणी,
पहिल्या पावसानंतर दरवळतो
जसा मातीचा सुगंध,
कविता लिहिताना
मी व्हावे तैसेची धुंद,
पण काय झालय
मला काही कळतच नाही,
शब्द हल्ली मनामध्ये
फिरकतच नाहीत.
पण कधीतरी होईल
एक सुंदरशी पहाट,
त्या दिवशी बहरेल
ही शब्द्फुलांची बाग़,
त्या पहाटेची बघते
मी आतुरतेने वाट...................
-ट्विंकल देशपांडे.
0 comments
Post a Comment