कुणी हसले तेव्हा हसलो, कुणी रडले तेव्हा रडलो
मज अलिप्तपणे जगण्याचा, सल्लाही कळला नाही
कुणी मनास रुसवुन गेले, कुणी उगाच फसवून गेले
माझ्या स्वातंत्र्यावरचा मज, हल्लाही कळला नाही
मी प्रवहासह वाहिलो , चाकोरीत अडकून राहिलो
मज आर्त भावनांचा ह्या, कल्लाही कळला नाही
कधी उगाच अडलो नाही, कधी कुणास नडलो नाही
कुणी लुटून मज भरलेला, गल्लाही कळला नाही
मी पूजा सूर्याची केली, मी नमन धरेला केले
मज राम समजला नाही, अल्ला ही कळला नाही
हरवलेल आकाश ( आकाश बिरारी )१४ एप्रिल २००९
|
0
comments
]
0 comments
Post a Comment