आज आता गाव हे सोडू कसा?
राहते जे अंतरी मोडू कसा?
वाहलेल्या भावनांचे नीर झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

खीडाकीला टेकून बसतांना ज़रा
वाहता वारा अडवलेला बरा
सोडला नि:श्वास आता खूप झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

गायचे जे स्वप्न ते गाणे जुने
मोजले मी सप्तकाचे स्वर उणे
सावळ्या नेत्रात माझ्या पूर आले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले..

जे मला घडवायाचे आहे पुन्हा
जे मनी रुजवायाचे आहे पुन्हा
ते जुने संस्कार आता दूर झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

("विंधलेल्या काळजाचे सूर झाले..." ही ओळ माझी नाही. क्षमस्व !!)
: अम्बरीष देशपांडे

0 comments

Post a Comment