१. बेसन आणि मैदा एकत्र करा. त्या नंतर एका तव्यात तुप गरम करण्यास ठेवून द्या.
२. त्यामध्ये पीठ मिसळून मंद गॅसवर किंचीत सोनेरी रंग येई पर्यंत गरम करून बाजूला ठेवून द्या. थोड्या वेळाने चमच्याने फ़िरवत रहा.
३. साखरेचा पाक तयार करून घ्या. त्यामधे नारिंगी रंगाचे व संत्र्याच्या अर्काचे २ थेंब टाका. त्यानतंर ते पिठाच्या मिश्रणात एकदम ओतुन घ्या.
४. त्यानंतर मिश्रणाला तार सुटेपर्यंत मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. तार सुटल्यानंतर मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीत १" चा थर होईल असे ओता.
५. वेलचीच्या बिया वरून पसरून वरून हलकेच दाबून घ्याव्यात.६. थंड झाल्यानंतर चौकोणी आकारात कापून घ्या व हवाबंद स्टीलच्या डब्यात साठवण करा.
0 comments
Post a Comment