चैत्र अग्निशिखा पेटवून जातो
अबोलीस गुलमोहर उजवून जातो

लज्जा हिरवी गळते अलवार
लालबुंद तो कटाक्ष चेतवून जातो

रक्तवर्णी पाकळ्या टोचती तनुस
स्पर्श उष्णसा फुलवून जातो

दिन बेभानसे पेटता फुलांनी
रात ठिणग्यांनी सजवून जातो

रात ठिणग्यांनी सजवून जातो
निखारे तो मेघांनी विझवून जातो

भले नाकार सत्य तू स्वप्ना
गुलमोहर तुज सुलगवून जातो

- स्वप्ना

0 comments

Post a Comment