गुल्लू
कट्टी फू..

अज्जिबात अज्जिबात
बोलणार नाही
मी तुझ्याशी
ज्जा
नाही येणार तुझ्यापाशी
ज्जा
जळत रहा तू एकटाच
हुं....

तुझ्याखाली
उभं असतांना
’ त्याने ’ माझा हात काय धरला.

टुप्पदिशी
मोठ्ठ्या शेंगेने
त्याला प्रसाद दिलास
डोक्यावर..

आणि खिदळलास
हिरव्या हिरव्या पानांआडुन

लाल लाल दात दाखवत..

जळकुटा कुठला..

- स्वप्ना

1 comments

Yawning Dog said... @ May 17, 2009 at 12:45 AM

vaa god ahe kavita

Post a Comment