|
0
comments
]
कैफात त्या बुडालो
होतो कसा कळेना ,
होती नशा तुझ्या त्या
नजरेत जराजराशी . . .
मिटताच पापण्या का
दिसते मला सदा तू ?
का आठवात माझ्या
असते जराजराशी . . . ?
एकांत आसवांनी
माझा सजून जातो ,
डोळ्यांमधून माझ्या
तू सांडते जराजराशी .
भेटीत आपुल्या त्या
का ओढ होती युगांची ?
थांबलीस तू ही जाताना
तेव्हा जराजराशी . .
- मंगेश
0 comments
Post a Comment