आज नव्याने दिवस उजाडला आहे
सर्व जगच छान वाटत आहे
मन पुन्हा ऊल्हासित झाले आहे
काही नाही आज पुन्हा ती मला दिसली आहे...

पानाफुलांतुन पक्षी किलबीलत आहेत
इंद्रधनुष्यही आपले रंग खुलवत आहे
पावसाचा गारवा आज अधिकच जाणवत आहे
कारण आज पुन्हा ती मला दिसली आहे...

आज मी जग जिंकलो आहे
स्वर्गाचा आनंद येथेच मिळवला आहे
तरीही मन शेवटी उदास आहे
कारण आज ती मला शेवटची दिसली आहे.................

0 comments

Post a Comment