मी म्हणालो देवाला--
हाल माझे पहा जरा
आज्ञा झाली प्रतिप्रश्नाने--
आठव तुझी कृत्ये जरा
शोध शोध शोधले मी,
नाहीच गवसलास तू...
कुठे होतो मी तेव्हा,
आला होतास जेव्हा तू...
खूप भटकलो इतस्ततः
अरे,तुझं घर शोधायला...
माझ्यात अहंकार भरलेला,
भेटशील तू कशाला मला ?
तुझी सृष्टी, तुझे सौन्दर्य
पाहण्यात मी दंग आहे...
सवड नाही बघावयाला,
की,खरा 'मी' कोण आहे ?
कल्पनेचा खेळ,द्वैत संपले
तू माझ्यात,मी तुझ्यात रे!
तू छायाचित्रात माझ्या ,
मी तुझ्याच छायेत रे !
....... अरविंद
रोज ढग भरून येतात बरसत मात्र नाहीत
मी विचारतो.. के रे बाबा काय ज्हाले
तेव्हा तो म्हणतो जिच्यावर बरसाव अशी तीच कुठे सापडत नाही!
मीच म्हणतो
अरे सकाळी सकाळी कुठे असणार ती
माज्या साठी anganaatalya तुलशी ला
पानी घालत असणार ती..
तेव्हा तो म्हणतो
अरे ते मला माहितीये पण ..
तीच शरीर आहे तिथ फ़क्त
तीच मन अणि ह्रदय जालेy कुठ तरी गुप्त
मग मीच म्हणतो
अरे ते तिला जड़ जालय
म्हणून तिने ते दान केलय
कदाचित असेल तिचा माज्यावर स्वतापेक्षाही जास्त विश्वास
म्हणून ते मज्याकडे जपायला दिलय....
मग तोच म्हणतो
अरे तू तर तिच्यासाठी दिवसातला एकाच तास देतोस
मी तर तिच्यासाठी वर्षातले चार मास बरसतो ..
तरी तिचा tuzyawarach जास्त विश्वास कसा
माज्या peksha तूच तिला जास्त प्रिय कसा??
मग मीच म्हणतो
अरे तू बरसत असशील तिच्यासाठी वर्षातले चार मास
करत असशील तिच्या शरीरावर थेम्बा थेम्बा ने वास
कदाचित तू भिजवले असशील नखशिकांत तिला
पण पानी तुजे आत पोहोच्लेच नाही रे तिच्या हृदयाला भिज्वायला
अरे एवढा मोठा तू एवढा ग्रेट तू ,तुला एवढा कलाले नाही
प्रेमाच रोपट इथ हृदयत वाढत तित तू पानीच घातल नाही..
एकाच तास होतो सोबत मी तिच्या पण
मी तिच्या मनातच घर केलय
तू भिजवात राहिलास तिच्या शरीराला फ़क्त
मी मात्र तिच्या मनात माज्याच प्रेमाचा बिज रुजवलय..
मग तोच म्हणतो
अरे कदाचित असेल तिचा ह्रदय तुज्याकडे
पण शरीराची ओढ़ तर मज्याकडेच आहे ना ..
माज्या वर्षावात भिज्न्यशिवय ते atruptach आहे ना ..
मग मीच म्हणतो
अरे कदाचित लागली असेल तिच्या शरीराला ओढ़ तुज्या वर्षावात भिजन्याची
म्हणून तुज्या नस्न्याने ती उदास होइल कधी
पण तीच हृदयच तर मज्याकडे आहे ना..
मज्याशिवाय ती श्वासच घेऊ शकणार नाही कधी ...
आता त्यानेही ठरवलेय सारखच नाही बरसायच
एकदा चुकलोत आपन आता पुन्हा नाही चुकायच
तेव्हा कुठे तो आता कधी तरी बरसतोय
बरसतो असा की लोकांच्या मनात स्थान मिलवतोय
लोकांना ही त्याचा हे रूप भावलय
पण त्यांना काय माहित त्याला हे मीच शिकवलेय
संकल्प अभाले
२२/०२/10
श्वासांच्या लयीत
गाते मी गाणे
छेडीत तूझ्या आठवाची विणा
भासाना कवटाळत शोधत असते
तूझ्या नजरेचे तराणे
चंद्राकडे टक लाऊन बघत
विखुरते मी मलाच
तू सापड्तच नाहीस रे
कुठे हरवलास
या ढगाना विचारले
पावसाची वाट आहे आता
चिंब भिजुन
लपवायचे राहीलेत अश्रु माझे
तोपर्यंत ओंजळीत घेतलेले
अश्रु प्यायचा प्रयत्न करते आहे
आणि पापण्य़ा कोरड्या
करीत आहे
कल्पी जोशी