श्वासांच्या लयीत
गाते मी गाणे
छेडीत तूझ्या आठवाची विणा
भासाना कवटाळत शोधत असते
तूझ्या नजरेचे तराणे
चंद्राकडे टक लाऊन बघत
विखुरते मी मलाच
तू सापड्तच नाहीस रे
कुठे हरवलास
या ढगाना विचारले
पावसाची वाट आहे आता
चिंब भिजुन
लपवायचे राहीलेत अश्रु माझे
तोपर्यंत ओंजळीत घेतलेले
अश्रु प्यायचा प्रयत्न करते आहे
आणि पापण्य़ा कोरड्या
करीत आहे

कल्पी जोशी

0 comments

Post a Comment