घुटमळतात माझे विचार,
तुझ्याच अवतीभवती,
भावनांच्या मधमाशा
गुंजन करतात तुजपाशी...
ओंजारून घे माझ्या विचारांना ,
गोंजारून घे माझ्या भावनांना ,
एकरूप होऊ दे त्यांना तुझ्यात....
सख्या मी कोण रे !
अरे तुझेच प्रतिबिंब ना !
माझ्या ह्रदय-दर्पणात दिसेल ते....
विलीन व्हायचंय मला,
तुझिया अस्तित्वात
तुझ्या रुपात मला एकरूप कर,
माझं 'मी पण''धुवून टाक,
होऊ दे आपलेपण ,
सख्या फक्त 'आपलेपण'
------------अस्मिता
|
0
comments
]
0 comments
Post a Comment