PART I

आई-बाबांनी शाळेच्या गेटपरियंत सोडून...
पाठमोऱ्या तुझ्याकडे बघून,
छोटसं एक स्वप्न पाहिलं.
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या शाळेच्या फी-साठी
बाबांनी अगाचं पाणी-पाणी केलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानेच मोडलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या नको त्या हट्टा-पायी
स्वतःचं नाव सुद्धा गहाण टाकलं ...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझा सुखी संसार जोडून
त्यांनी मात्र ,
त्यांच्याच घरातून पाऊल बाहेर काढलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

0 comments

Post a Comment