तुमचा माहितीचा प्राथमिक स्रोत कोणता, असे विचारल्यास आज १० पैकी आठ जण इंटरनेट असेच उत्तर देतील. आपण दररोज किमान पाच-पन्नास साईट्सना नक्कीच भेट देत असू. एखाद्या साईटवर असलेल्या लिंक्स इंटरेस्टिंग वाटल्या तर तेथेही जाऊन आपण अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही साईट्स आणि ब्लॉग्जवर तर अशा रिलेटेड पोस्ट्स आणि साईट्सचा खजिनाच दडलेला असतो. या पद्धतीने माहिती गोळा करताना मूळ साईटवरून इतके भरकटायला होते, की आपण काय वाचत होतो, हेच लक्षात राहत नाही. शिवाय अनेक लिंक्स क्लिक केल्यामुळे विंडोज (किंवा टॅब्ज)ची गर्दी होते. मोठ्या अपेक्षा ठेवून क्लिक केलेल्या लिंक बऱ्याच वेळा अपेक्षाभंग करतात. त्यामुळे आपला वेळही वाया जातो. त्या लिंकवर नेमकं काय आहे, याचा क्लू मिळाला तर?इंटरक्लू हे फायरफॉक्सचे एक्स्टेंशन वापरून तुम्ही तुमची सर्फिंग प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकता. इंटरक्लू तुम्हाला लिंकचे टीझर किंवा ट्रेलर दाखवते. कसे ते सांगतो. इंटरक्लू इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या साईटला भेट द्याल (उदा. न्यूयॉर्क टाईम्स) तेव्हा हायपरलिंक केलेल्या प्रत्येक इलेमेंटचे ट्रेलर तुम्हाला पाहता येईल. संबंधित लिंकवर माऊस पॉईंट केल्यानंतर काही मिलिसेकंदात त्यासमोर इंटरक्लूचा किंवा त्या साईटचा फेव्ह-आयकॉन दिसायला लागेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मूळ विंडोत एक छोटी विंडो ओपन होईल व त्या लिंकवर काय आहे याची थोडक्यात माहिती पाहावयास मिळेल. त्यानंतर तुम्ही संबंधित लिंकवर जायचे किंवा नाही, हे ठरवू शकता.
इंटरक्लू टेक्स्ट, व्हिडीओ, पीडीएफ, इमेजेस आदी सगळ्यांचे ट्रेलर तुम्हास दाखवू शकतो. तसेच इंटरक्लूच्या छोट्या विंडोतून तुम्ही संबंधित लिंक फेव्हरेटमध्ये अॅड करू शकता, ई-मेल करू शकता, कॉपी करून घेऊ शकता, डिग, न्यूजव्हाईन, डेलिशियस किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता आणि प्रिंटही करू शकता. या छोट्या विंडोचा आकार कमी-जास्त करण्यापासून ते लिंकचे स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले करण्यापर्यंत अनेक कस्टमायजेशन्स तुम्ही यात करू शकता. त्यासाठी इंटरक्लूच्या सेटिंग्ज पाहा. थोडक्यात काय तर, मस्ट हॅव, असे हे एक्स्टेंशन आहे. इंटरक्लू इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment