तुझे लाजणे असे अवेळी
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...
वारा देखील मंद जाहला
सखी साजणी ...
आसपास तो फक्त केवडा
गातो गाणी ...
अश्याच समयी तुझी शांतता
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...
सांज अताशा निखळत आली
क्षितिजावरुनी ...
लाटांचे बघ फक्त बोलते
हळवे पाणी ...
तरी मनांची लाट कोरडी
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...
संतोष (कवितेतला)
|
0
comments
]
0 comments
Post a Comment