भल्या पहाटे मला सोडून कुठे तूं गेलीस ?
ढगां मागे लपते, मला दिसत कां नाहीस ?
लहान आहेस कां तूं, ढगां मागे लपायला ?
आमच्यात येना कधी, लपंडाव खेळायला !
म्हणतात " तुला आता नवी आई आणणार "
तूच सांग ना आई मजसी, तूं कधी येणार ?
बाबाला विचारले तर उत्तर देत नाही
तूच सांग ना आई त्याला, मला माहीत नाही
नेहेमी मला सोडून, कुठे कुठे जायचीस
दिले जाऊ नसते , सांगून गेली असतीस ?
बाबा म्हणतो रोज रोज तेच नको विचारू
तूच सांगना आई कसे मी मजला सांवरू ?
सुरेश पेठे२६एप्रिल०९
|
0
comments
]
0 comments
Post a Comment