"स्वतःला अत्यंत आवश्यक असलेली वस्तूही जो दुसऱ्याला आनंदानं देतो, अशा त्यागी माणसाला सत्पुरुष म्हणतात. तुमच्यापैकी कुणी - स्वतःला अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट दुसऱ्याला आनंदाने द्यायला तयार होईल का?" गुरुजींनी वर्गाला विचारलेला हा प्रश्‍न कानी पडताच गणु पटकन्‌ उभा राहिला व म्हणाला, "गुरुजी! मी देईन."मोठ्या कौतुकानं गुरुजी म्हणाले," अरे वाः! या वर्गातला एक तरी मुलगा भविष्यकाळात सत्पुरुष होणार, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. गणू, खरोखरच तुझं जेवढं कौतुक करावं, तेवढं थोडंच होईल. आता तुला जी अत्यंत आवश्यक आहे, आणि तरीही जी दुसऱ्याला आनंदानं देण्याची तुझ्या मनाची तयारी आहे, अशा एखाद्या गोष्टीचं तू मला नाव सांगतोस का?"अतिशय उत्साहनं गणूनं उत्तर दिलं, "एरंडेल."

0 comments

Post a Comment