का असतो वारा अदृश्य?
समोरचं स्पष्ट दिसावं म्हणून?
की, मंद वारयाची झुलुक येताच.......
अलगत डोले मिटून मनातलं 'वादळ' उठावं म्हणुन?
का बधिर असते शांतता...?
अद्न्यात वासाची सफ़र करून
मन प्रसन्न व्हावं म्हणुन.....
की, भूतकालातील कटु आठवणी स्मरून
मन सून्न व्हावं म्हणुन?
का असतो थंडगार हिवाला ?
या आल्हाददायी वातावरणात
नाते संबंध घट्ट व्हावेत म्हणुन.....
की, 'कवेत घेणारं कुणीच नाही'
या एकाकी पणाची जाणीव व्हावी म्हणून?
का असतो ओलाचिम्ब पावसाला ?
स्रुष्टिचं हिरवंगार लेण पाहून
डोळ्यांची पारण फिटावित म्हणून.....
की, पावसाची धार नि डोळ्यांतले अश्रू
यांतला फरक कोणाला कलुच नये म्हणून?
का मूक असतात भावना?
समोरच्यानं नजरेतच ओलाखावं म्हणुन.....
की, या फसव्या अपेक्षेने
कायम अव्यक्तच रहावं म्हणुन?
का, स्वताचा रंग नाही पाण्याला?
ज्यात मिसलावं त्याचंच होउन जावं म्हणून.....
की, या उदाहारनातुनच
'स्त्री' जन्म कलावा म्हणून......?

0 comments

Post a Comment