एक होता विदुषक
अगदी माझ्या सारखा
नेहमी सर्वांना हसवायचा
हसवणे त्याची कलाच होती
हास्याचा जणू तो निर्माता होता..
:
हसण्यात मग्न असायचे सर्व
इतरांना ते समजत नव्हते
हसवताना तो स्वतः मात्र
खोल विचारात हरवून जायचा
त्याची होणारी ती अवस्था
माझ्या पेक्षा वेगळी नव्हती...
:
हसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात
तो फक्त तिलाच शोधायचा
लपलेली असायची ती कुठेतरी
त्याला दिसायची सुद्धा ती हसताना
शेवटी तो त्याचा भासच असायचा
क्षणात ती अदृश्य व्हायची...
:
ती आपली कधीच होऊ शकत नाही
याची पुर्णतः जाणीव त्याला होतीच
त्याला याचे वाईट सुद्धा वाटायचे
तरी तो तिच्या वरच प्रेम करत राहिला
कदाचिद यालाच खरे प्रेम म्हणतात...
:
पण काय ते म्हणतात ना प्रेमा बद्दल..
खरे असेल तर ते एकदाच होते आयुष्यात
असेच काहीसे त्याचे नि माझे सुद्धा...
:
--हरिष मांडवकर
१८-०८-२००९

1 comments

Unknown said... @ December 18, 2009 at 4:51 PM

rajeshmsk0074@gmail.com

Post a Comment