जिच्या नावे या शहराला मुंबई म्हटलं जातं ती मुंबादेवी! साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी या देवळाची स्थापना आत्ताच्या सी.एस.टी विभागात झाली. इंग्रज सरकारने तिथे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजसेवक पांडूशेठ सोनार यांच्या प्रयत्नाने १७३७ साली आजचं देऊळ बांधण्यात आलं. मुंबादेवीच्या उजव्या बाजूला अन्नापूर्णा देवीची मूतीर् आहे. प्रामुख्याने कोळी , पाचकळशी समाजातील नवविवाहित जोडपी देवीच्या दर्शनाला येतात. मंुगा या कोळी जातीच्या जमातीवरून या देवीला मंुगादेवी असं म्हणत त्याचाच पुढे अपभ्रंश मुंबादेवी असा झाला. पुराणकथेनुसार मंुबारक या विशालकाय प्राण्याचा संहार करण्यासाठी शंकर आणि विष्णू यांच्या तेजापासून या देवीचा जन्म झाला. मंुबारकाचा संहार केल्यानंतर त्याने देवीची क्षमा मागितली आणि तिचा आशीर्वाद मागितला. तेव्हा देवीने त्याच्या नावारून स्वत:चं मुंबादेवी हे नाव घेतलं.
0 comments
Post a Comment