मुंबईचं महालक्ष्मी मंदिर प्रसिध्द आहे. इथे महालक्ष्मी , महाकाली आणि महासरस्वती या तीन रूपांत दुर्गामाता प्रकटली असं सांगितल जातं. १७२० पर्यंत हे देऊळ वरळी गावात होतं , परकी आक्रमणांमुळे अनेक देवळातील मुतीर् सुरक्षित ठिकाणी लपवण्यात किंवा विसजिर्त करण्यात आल्या होत्या , त्याप्रमाणे ही मूर्ती समुदात विसजिर्त करण्यात आली होती. काही काळानंतर एका कोळयाच्या जाळयात ही मूर्ती मिळाली. तर काहीजण सांगतात की , जेव्हा इंग्रजांनी मुंबईच्या सात बेटांना जोडण्याचं ठरवलं तेव्हा या कामाचा ठेका दिलेल्या शिवाजी प्रभू नावाच्या ठेकेदाराला अजब गोष्टीचा सामना करावा लागला. समुदात जेवढा भराव घातला जायचा तेवढा पाण्याखाली जायचा. इंग्रजसुध्दा या गोष्टीने हैराण झाले. तेव्हा त्या ठेकेदाराला दृष्टान्त देऊन देवीने सांगितलं की , ' माझी समुदात विसजिर्त केली गेलेली मूर्ती बाहेर काढा , तुमचं काम सोपं होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्ती बाहेर काढल्यानंतर समुद शांत झाला. मग इंग्रजांनीही देवीचं देऊळ बांधायला जागा दिली.

0 comments

Post a Comment