तुझी आठवण आली म्हणुन
पाणवले डोळे
या जगात माझ्या सारखे
असतील किती खुळे
डोळ्यात माझ्या जमले
होते तारका पुंज
मीच माझ्या मनाशी
देत होतो झुंज
तुझी आठवण आली म्हणुन...
सुन्न पडले होते मन
पडले होते गात्र क्षीण
मीच माझे नाखुशीने
मारत होतो मन
आठवत होती तेव्हा मला
तुझी परवलीची खुण
तुझी आठवण आली म्हणुन...
आठवत होतो सहवासाचे क्षण
तुझा तो प्रश्न जपतोय मी
करशील का रे माझे रक्षण ?
पण! पण! मीच माझा
अन् तुझा केव्हाही नव्हतो
समाजाच्या बंधनात स्व:ताला
शोधत होतो , शोधत होतो स्व:ताला
आणि .....
तुझी आठवण आली म्हणुन...
मला जिंकन्याच्या प्रयत्नात
तुही हरली होती
मी मात्र हरवताना तुला
स्वताच हरलो होतो
तुही नाही, मीही नाही,
दुसरेच जिंकले होते
त्यांच्या मते त्यांनी
गुंफले होते रेशमी बंधाचे नाते.
समजले मला आज
तू लाचारीने जागतेय
स्वत:च केलेल्या चुकांचे
वाईट फळ भोगतेय
पण पण मीही...
यापेक्षा काही वेगळा नाही
इथेच मी अनुभवतोय
मृत्युची खाई
मरता मरता जगताना
जिवंत प्रेत फिरतोय,
मनात फ़क्त तुझा आणि
फ़क्त तुझाच विचार करतोय
एकदाच संपविन म्हणतोय
हे नीरस आयुष्य
दररोज मारताना जगतोय
यात नाही आता स्वारस्य
पण ....
परत शेवटी तेच आडवे येतात
सैल झालेल्या बंधनात
परत परत बांधतात
शेवटी मी ही लाचार
सहन करतोय अत्याचार
नाही होते हे सहन
मरताना तोडायचेय मला
हे जीवनातील बंधन !!!
मरताना तोडायचेय मला
हे जीवनातील बंधन !!!
---------------------- बाजी

0 comments

Post a Comment