तू मला सोडून गेल्यानंतर म्हणे, 'माझी आठवण तुला येत नव्हती',
मग का गं माझ्यासाठी रात्र-रात्र तू अशी जागून काढत होती...?
माझी आठवण येत नव्हती तरी...
माझे 'नसलेले' अस्तित्व का गं तुला सालायचे ?
अन् त्या गुलाबाच्या पाकळ्यातले पाणी ओसंडून बाहेर पडायचे..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
का गं माझ्या पत्रांची सतत तू वाट पाहायची ?
पत्र नसल्यामुळे दरवेळेला, मनातच माझ्यावर रूसायची..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
पहिल्या पावसात का गं चिंब-चिंब भिजायची ?
अन् जोडीला मी नसल्याची सल नेहमीच मनात असायची..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
का गं तुझ्या लग्न-मंडपात, तुझी नजर माझ्या वाटेकडे आसुसलेली होती ?
मन माझ्यात होते तुझे, जरी तुझ्या साथीदाराशेजारी तू बसलेली होती..!
माझी आठवण येत नव्हती तरी...
मी 'गेल्याचे' कळताच स्मशानात माझ्याआधी तू कशी गं आली होती ?
अन् त्यानंतर तुझी जगायची आसक्तीच पार संपली होती..!
अन् कायतर...
तू मला सोडून गेल्यानंतर म्हणे, 'माझी आठवण तुला येत नव्हती...'
- केवल बेदरे
|
0
comments
]
0 comments
Post a Comment