मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

संकट अफाट हे पाहत नाही वाट
शक्य त्या परी मदतीस सुरुवात
श्रीमंती गरिबी आणि जात पात
विसरुनी सार मदतीस धावतात

मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

निसर्गाचा मार शत्रूंचे वार
दुखाचे भार अश्रूंची धार
परिवाराचा गमावूनी आधार
नव्या उमेदीन रोज हि उठतात

मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

जखमांची आग दुख ते आठवूनी
शहिदांचा त्याग हृदयात साठवूनी
हताश न होता धीर एकमेकास देतात

मुंबई ची माणस
माणुसकीच नात
आगळी वेगळीच
जिद्द मनात

राजकारण्यांची क्रूर राजनीती
थोड्या वेळासाठी मन वळविती
संकटाच्या वेळी मात्र संपते हि खेळी
मदतीचा हात देऊन एकमेकास
सगळ्यांची मन हि जिंकतात

मुंबई ची माणस
माणुसकीच ना त
आगळी वेगळीच
जिद्द मनात

दिनेश ..................

0 comments

Post a Comment