गरिबांचे हे जग निराळे
गरीबीतही सुखी आहेत सगळे
जो तो आहे कर्जाखाली
आहे बेकारांची रांग भली
जिथ दारिद्र्याची मगरमिठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

जरी गरीब असले धनाने
श्रीमंती आहे मानाने
निरनिराळी आहे जात
माणुसकीचे आहे नात
नाही भेदभाव जिथ कुणासाठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

रोज भांडण तंटा मारामारी
शिव्यांची गुंजते किलकारी
अडचणीतही मग कामी येतात
भांडणारे ते शेजारी
दिलदार कधी तर कधी हट्टी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

आयुष्याची शर्यत मोठी
जो तो लढतो पोटासाठी
जिथ माणूस मरतो भूकेपोटी
जिथ आई राबते लेकासाठी
जिथ बाप झटतो इज्जतीसाठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

पैशापाई खेळ हा सगळा
मार्ग निवडती वेगळा वेगळा
कधी खूप कष्ट कधी कंटाळा
झगडे कधी तर कधी जिव्हाळा
मनी त्यांच्या हि स्वप्ने मोठी
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
या पैश्याच्या पाठी पाठी
झोपडपट्टी हि झोपडपट्टी

दिनेश......

1 comments

bala said... @ September 3, 2009 at 10:51 PM

Useless!!!

Post a Comment