म्हणतात तसं, आपलं डोकं फिरवतं
पहिलं प्रेम आपल्याला शिकवतं

कॉलेजच्या दिवसात
जूनच्या पहिल्या पावसात
आभ्यासाच्या त्रासात
कंटाळवाण्या गणिताच्या क्लासात

आपल्याला दिसते ती सुंदर तरूणी
पु. लं. च्या वर्णनातली ती सुबक ठेंगणी

हृदयाला प्रेम झाल्याचं पटतं
आपल्याला पावसात भिजल्यासारखं वाटतं

आपल्याला अभिमानाने मिरवतं
पहिलं प्रेम आपल्याला शिकवतं

आपण तिला रोज बघतो
दिवसातही तिच्या स्वप्नात जगतो
तिच्या प्रेमात ठार वेडे होतो

बोलण्याची हिम्मत करत नाही
ती आपल्याकडे बघतही नाही
आपलं जगणं तिला माहितच नाही

आपल्याला आपली जागा दाखवतं
पहिलं प्रेम आपल्याला शिकवतं

जेवणाच्या तासात
वडा-पावाच्या मंद वासात
तिच्या सहवासात

आपण दुसऱ्याच कुणालातरी पाहतो
तिथेच शुंभासारखे उभे राहतो

काहीतरी हरवल्यासारखं वाटतं
काहीतरी विसरल्यासारखं वाटतं
आपण चिखलात घसरल्यासारखं वाटतं

आपली चांगलीच जिरवतं

0 comments

Post a Comment