जवा ग्येलो होतु पगायला, म्हाज्या गंगुला,
ईचारान्नी क्येलं होत हैरान, आमच्या डोसक्याला,
पन गंगु समोर येताच, लागली ग्वाड लाजायला,
आमचं नरम कालीज, लागलं बिगी-बिगी पागळायला.

अंबाबाईच्या साक्षीनं, क्येलं आम्ही लगीन,
म्हनलं झकासमंदी आता, आवुक्षं घालविन,
गंगु म्हनली, रोज झुनका-भाकर चारीन,
सांच्याला व्हरांड्यात, तुमची वाट बगत बशीन.

पन कसली झूनका-भाकर अन कसलं काय,
रातच्याला, आम्हीच च्येपतुया तिचं हात-पाय,
कधी म्हनलं, पुरन-पोळी करून द्येतीस काय,
तर म्हनती, ह्ये हातातलं लाटनं बगितलं काय.

सकाळच्याला, म्हशिचं दूध म्या काढतु,
गनप्याचं शेंबडं नाकबी, म्याच पुसतु,
तिचं नौवारी लुगडं, म्या धुतु,
अन शेतामंदीबी, म्या येकटाच राबतू.

सपान म्या कंदी, बगत न्हाय,
थतंबी धुपाटनं घिऊन, गंगु हूबी हाय,
आता आठिवत्यो, माझा बा आन माय,
हिला बगायला ग्येलो तवा, डोसकं श्येन खात व्हतं काय.

दोस्ताला म्हनलं, ह्यो समदा परिनाम कशाचा,
म्हनला, ल्येका, ह्योच तर हाय फोबिया प्रेमाचा.... ह्योच तर हाय फोबिया प्रेमाचा....

~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~

0 comments

Post a Comment