माता ज्याची थोर जिजाऊ
शहाजी ज्याचे पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभरती
होती ती मराठी अस्मिता ||
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी
तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच फडफडला ||
तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने मावळा
स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी
सोसल्या लाखो कळा ||
धोक्यात आहे आज पुन्हा मराठी
काढूनी टाका सुरांतून नाराजी
उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा अन् तोच शिवाजी ||

0 comments

Post a Comment