आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल
देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
..............वैभव आलीम (०३/११/१०)
का कुणास ठाउक ??????
का कुणास ठाउक ??????
कधी न भेटलेले
कधी न पाहिलेले
चेहरे कधी समोर आले !!!!!!
आणि .... नकळत तेच माझे मित्रही झाले
सुखात आणि दू:खात माझ्या
ते देखिल सहभागी झाले
आयुष्याचे प्रत्येक क्षण त्यानी वाटुन घेतले
जाता जाता .... विसरणार नाही तुला ......
असेही मला सांगुन गेले
पण ........ का कुणास ठाउक ?????
आज तेच चेहरे , तेच मित्र
माझ्यापासून खूप दूर-दूर गेले
का कुणास ठाउक ???
का कुणास ठाउक ?
........ वैभव आलीम (२९-०७-०९)
कोणीतरी असावं आपलं
भरकटलेल्या वाटेवरून
हात धरून मागे आणणारं
कोणीतरी असावं आपलं
ओघळणाऱ्या अश्रुनाही
हळुवारपणे पुसणारं
कोणीतरी असावं आपलं
सुखात माझ्या सहभागी होणारं
दु:खातही मायेने सांत्वन करणारं
कोणीतरी असावं आपलं
आंधळ्या झालेल्या नेत्रांनाही
डोळसपणे मार्ग दाखवणारं
कोणीतरी असावं आपलं
अंधारातही आपल्यामागे
ज्योती बनून वावरणार
पण ..............
कोणीतरी असण्यासाठी
आपणही त्याचे कोणीतरी असावं
......... वैभव आलीम (०८-०४-१०)
तुझही नि माझही प्रीत
आयुष्यास्याच्या नागमोडी
वळणावर एक
सुरेख सुंदर सफारी
सुख दुख म्हणजे
उंन पावशाचा खेळ
त्यात प्रेम म्हणजे
umalanaara इंद्रधनू
ह्यांची तर्हा चा न्यारी
कधी हसन ,कधी रागावन्न
थोडा तुझ्हा थोडा माझह
कधी लटका राग
कधी खूप खूप प्रेम
अशी एका प्रेमाची कथा सारी
सुंदर चेहऱ्यावर
हास्याचा दागिना
शालीन्तेला जोड म्हणून
सौज्याण्याचा खजिना
वरउन तारुण्याची बहारी [3]
प्रेमाची गंध नास्रारा
स्वतात गुंतून स्वतालाच शोधणारा
झाला कुणासाठी अधीर आज
गाऊ लागतो आज प्रेमाचा नजराणा
हि प्रेमाचीच किमया सारी [४]
चंद्राचा उजेड देहाच्या ओंजळीत पडल्यामूळे बेभान चालण्यार् या दोन साउल्या.........एक तुझी नी एक माझी......खरं तर त्या दिवशी सिनेमेला जाण्याच ठरवलं होत पण रस्त्याच्या परद्या वर आपल्या साउल्यांनी असा काही खेळ मांडला की शेवट तो चन्द्र सुद्धा कंटाळून निघून गेला आणि उषाच्या हाती घरी जाण्याचा निरोप पाठवला.........
कॉलेजमधे नेहमी गैरहाजर असणारे समीर आणि सलील दोघेही त्या दिवशी नेमके before the time आले होते. समीर तुझ्या केसांना अगदी अलगद जोपाऴया वर बसवून झुलवत होता आणि सलील दिवसभर तुझ्या चेहऱ्यावर पडलेल्या भास्करच्या नजरेची खबर घेत होता ...........
त्याच दिवशी मी माझ्या ह्या 5 फूट 7 इंची देहाला तुझ्या त्या 200 सेन्टीमीटरच्या ह्रुदयात प्रवेश मिऴविण्याची परवानगी मागितली होती. पण भौतिकशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून तू एवढेच उत्तर दिले की " सेन्टीमीटर कुठे आणि फूट कुठे?????????"..........................
आता आम्ही राहिलो भावनेच्या शाळेचे भोळे विद्यार्थी!!!!!!!!!!!!!!!!! ही अशी unit match करण्याची सवय कुठे असते ग आम्हाला????? mood झाला तर कधी चंद्राला पण गिळतो तर कधी सूर्यावर जाउन क्षणात पुन्हा धरतीवर फिरतो.
एकदा तूच बोलली होती देह हा electrons , protons वगैरे वगैरे नी बनलेला असतो. म्हणून मग अस केलं की माझ्या जिवाला electrons मधे ओतला आणि नंतर मग माझे ते प्रेमाचे electrons तुझ्या त्या गुलाबी ओठां पासून एक इंच डावीकडे नी दीढ इंच खाली असलेल्या 1 मिलीमीटर diameter च्या काळ्या तिळावर थडकावले आणि तुमच्या भौतिकशास्त्रा प्रमाणे माझी " प्रेम energy " तुझ्या त्या तिळात transfer झाली..
आणि तेव्हा कुठे हा 5 फूट 7 इंची देहाला माझा 0.01 सेन्टीमीटर चा मित्र उचलून त्या तुझ्या 200 सेन्टीमीटर च्या हृदयात ठेवून आला...........
आता हे सगळं सगळं आठवतयं........................
--आमोद कुलकर्णी ( स्वरचित )
फुलांचा उखाणा
चाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मी चाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मीचाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मी फुलांचा उखाणा
(अनुपमा मुंजे.- ४.१२.२०११)
घोटाले घोटाले घोटाले घोटाले
काहो करता घोटाले
स्वार्थी लोकान्नो कारे
करता देशाचे वाटोले
टीच भर पोटा साठी
नका लागु भ्रष्टाचा राच्या पाठी
एवढ करता कोना साठी
काय लागत जगण्या साठी
पापाचे पापाचे पापाचे नका भरू गाठोडे
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले
आपला देश आहे महान
जगात त्याला मान
गाउया त्याच गान
नका करू अशी घान
नका रे नका रे नकारे करू अस वाटोले
का रे करता तुम्ही असे घान घोटाले
भल्या मोठ्या विश्वा साने निवडून आम्ही देतो
गोड गोड तुमचे गाने मुखाने आम्ही गातो
स्वच्छ संस्कृतीचे स्वप्न आम्ही पहातो
नकारे नकारे नकारे जाऊ देऊ असे तडे
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले
घोटाले घोटाले घोटाले कारे करता घोटाले
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले
.......भारत माता की जय ........
"तरुणाननो एक जूट व्हारे
बंद करुया भ्रष्टाचाराचे वारे "
विनोद शिंदे - vinoda shinde @yahoo.co.in
दिनांक -३/११/२०११
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। भारत माता की जय ।।