आता सगळं सगळं आठवतयं........................
चंद्राचा उजेड देहाच्या ओंजळीत पडल्यामूळे बेभान चालण्यार् या दोन साउल्या.........एक तुझी नी एक माझी......खरं तर त्या दिवशी सिनेमेला जाण्याच ठरवलं होत पण रस्त्याच्या परद्या वर आपल्या साउल्यांनी असा काही खेळ मांडला की शेवट तो चन्द्र सुद्धा कंटाळून निघून गेला आणि उषाच्या हाती घरी जाण्याचा निरोप पाठवला.........

कॉलेजमधे नेहमी गैरहाजर असणारे समीर आणि सलील दोघेही त्या दिवशी नेमके before the time आले होते. समीर तुझ्या केसांना अगदी अलगद जोपाऴया वर बसवून झुलवत होता आणि सलील दिवसभर तुझ्या चेहऱ्यावर पडलेल्या भास्करच्या नजरेची खबर घेत होता ...........

त्याच दिवशी मी माझ्या ह्या 5 फूट 7 इंची देहाला तुझ्या त्या 200 सेन्टीमीटरच्या ह्रुदयात प्रवेश मिऴविण्याची परवानगी मागितली होती. पण भौतिकशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून तू एवढेच उत्तर दिले की " सेन्टीमीटर कुठे आणि फूट कुठे?????????"............................................

आता आम्ही राहिलो भावनेच्या शाळेचे भोळे विद्यार्थी!!!!!!!!!!!!!!!!! ही अशी unit match करण्याची सवय कुठे असते ग आम्हाला????? mood झाला तर कधी चंद्राला पण गिळतो तर कधी सूर्यावर जाउन क्षणात पुन्हा धरतीवर फिरतो.

एकदा तूच बोलली होती देह हा electrons , protons वगैरे वगैरे नी बनलेला असतो. म्हणून मग अस केलं की माझ्या जिवाला electrons मधे ओतला आणि नंतर मग माझे ते प्रेमाचे electrons तुझ्या त्या गुलाबी ओठां पासून एक इंच डावीकडे नी दीढ इंच खाली असलेल्या 1 मिलीमीटर diameter च्या काळ्या तिळावर थडकावले आणि तुमच्या भौतिकशास्त्रा प्रमाणे माझी " प्रेम energy " तुझ्या त्या तिळात transfer झाली..

आणि तेव्हा कुठे हा 5 फूट 7 इंची देहाला माझा 0.01 सेन्टीमीटर चा मित्र उचलून त्या तुझ्या 200 सेन्टीमीटर च्या हृदयात ठेवून आला...........

आता हे सगळं सगळं आठवतयं........................

--आमोद कुलकर्णी ( स्वरचित )

0 comments

Post a Comment