आज ओफीसातून जरा लवकर निघ,
७.१२ च्या लोकल ची मुद्दामहून विंडो सीट पकड.
घरी जायची ओढ असेल,पण तू घाई करू नकोस.
वी.टी ते ठाणे जरा ट्रॅक च्या बाजूची बकाल झोपडपट्टी बघ,
बघ 'राज साहेबांची' आठवण येते का?

दरम्यान जरा डब्यातले संवाद ऐक,
सगळे हिंदीतून बोलत असतील.
तुझे मित्र,सगे, आप्त् पण.त्याला आक्षेप घे.
तुझ्या समोर बसलेला उर्मट भैय्या तुझी खिल्ली उडवेल
आणि सारा डब्बा तुझ्यावर फिदी फिदी हसेल.
तेव्हा तुझ्या हाताच्या आवळलेल्या मुठी कडे बघ
बघ 'राजसाहेबांची' आठवण येते का?

ठाणे स्टेशन ला उतर, थोडा १ नंबर वरुन बाहेर ये
रस्त्याच्या कडेला, फूटपाथ वर अनेक सी.डी चे स्टॉल दिसतील
साहजिकच ते भैय्यांचे असतील.
त्यातल्या त्यात जरा व्यवस्थित दिसणार्‍या भैय्या कडे जा,
हळू आवाजात त्याला विचार ब्लू प्रिंट आहे का?
तो बिनधास्तपणे मोठ्याने बोलेल,
"साब अंग्रेजी दु के देसी? मराठी वाली लाने का भी सोच रहे है"
तुझ्या तोंडात शिवी येईल, पण बाहेर पडणार नाही.
बाहेर पडायची असेल तर.........................
बघ राज साहेबांची आठवण येते का?

0 comments

Post a Comment