श्री दत्त नमस्काराष्टक
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh
श्री दत्त नमस्काराष्टक
श्रीगणेशाय नमः ॥ अथ श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्रप्रारंभः ॥
सदा प्रार्थितों श्रीगूरूच्या पदांसी ॥ धरीतों शिरीं वंदितों आदरेंसीं ॥
धरूनी करीं तारिं या बाळकासी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥१॥
मतीहीन मी दीन आहें खरा हो ॥ परी दास तूझा करीं पाखरा हो ॥
जसें लेंकरूं पाळिते माय कूशीं ॥ नमस्कार० ॥२॥
लडीवाळ मी बाळ अज्ञान तुझा ॥ गुरुवांचुनीं पांग फेडील माझा ॥
तुझ्यावीण दूजा कुणी ना अम्हांसी ॥ नमस्कार० ॥३॥
पिता माय बंधू सखा तूंचि देवा ॥ मुलें मित्रही सोयरे व्यर्थ हेवा ॥
कळोनी असें भ्रांति होई अम्हासीं ॥ नमस्कार० ॥४॥
चरित्रें गुरूचीं करी नित्यपाठ ॥ जया भक्ति लागे पदीं एकनिष्ठ ॥
तयाचे कुळीं दीप सज्ञानराशी ॥ नमस्कार० ॥५॥
वसे उंबरासन्निधीं सर्व काळ ॥ जनीं काननीं घालवी नित्य काळ ॥
तया सद्गुरूचें नाम कल्याणराशी ॥ नमस्कार० ॥६॥
श्रमोनी गुरूपाशिं तो म्लेच्छ आला ॥ तया स्फोटरोगांतुनी मुक्त केला ॥
कृपेनें तसें स्वामि पाळीं आम्हांसी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥७॥
सती अनुसूया सूधी आदिमाता ॥ त्रयीमूर्ति ध्यानीं मनीं नित्य गातां ॥
हरे रोगपीडा दरिद्रासि नाशी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥८॥
करोनी मनीं निश्चयो अष्टकाचा ॥ जनांनो करा पाठ दत्तस्तुतीचा ॥
करी माधवाच्या सुता दासदासीं ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥९॥
इति श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्रं संपूर्णम् ॥
Translation - भाषांतर
|
0
comments
]
0 comments
Post a Comment