गळतीच्या धारेला पळतीचा पाऊस
अलिकडे पलिकडे घालतोय धुडगुस
पानं पानं बिथरली अंगोपांगी शहारे
नवतीच्या अंगोबाला तारुण्याचे धुमारे
कारुण्याचे मोर मनी पाखडती पिसारे
सोसाट्याला कुणी सांगा बिथरले सारे

पिसाट्याची पोर म्हणे पिसाटली पार
गाभुळल्या ओठालागी पिशी पिशी धार
सपासपा शिडकावा ओलेत्याची झाडी
नादावली पोर थोडी भांबावली थोडी
पाणी पाणी खळाखळा काढे तिची खोडी
दंगामस्ती अंगाची गा विस्कटली घडी

असा तिचा सखा कसा घावला उनाड
धडगत नाही तिची पडली गा धाड़
------------------------------------------
ganesh adkar,shirwal

0 comments

Post a Comment