ब्लॉग म्हणजे काय? हया प्रश्नाचे खरेतर उत्तर असुनही ब-याच जणांसाठी हा अनुत्तरित प्रश्न आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लॉग ची व्याख्या मांडू शकतो. अगदी विस्तारीत स्वरूपापासून ते टेक्नीकल भाषेतसुद्धा. ब्लॉग म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर ब-याच हुशार व्यक्तीनी ब्लॉग बाबत केलेली व्याख्या इथे आपण पाहुयात.
एका एजन्सी अनुसार -
"एका विशिष्ट पद्धतीने अक्षर, चित्र आणि माहितीची व्यवस्थित मांडणी जी आपण HTML या ब्रोजर च्या माध्यमातून पाहू शकतो"
ब्लॉग म्हणजे -
वेब लोग (Web Log) च्या अनुसार, "एक श्वेतपत्रिका जी नेहमी इनटरनेटवर पहाण्यास मिळणे. एक असे काम ज्यामध्ये नेहमी नविन गोष्टींची भर टाकत रहाणे म्हणजेच BLOGGING आणि एखादी व्यक्ति या सगळ्या गोष्टींचे कामकाज पहाते किंवा पाहतो तो BLOGGER.
ब्लॉग म्हणजे -
एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट गोष्टी बाबत मार्गदर्शन केलेला विषय जो एक न थांबणारा प्रवास आहे. इथे प्रत्येकजण कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करू शकतात. हा एक असा प्रवास आहे ज्यामधुन समाजासाठी एक विशिष्ट मेसेज जातो जो त्यांच्यासाठी हितकारक ठरेल. यामध्ये BLOGGER ही व्यक्ति निरनिराळ्या प्रकारची आकर्षक मांडणी करुन त्यामध्ये IMAGE, TEXT व GRAPH च्या साहाय्याने आपलं म्हणणं व विचार समाजासमोर मांडू शकतो.
ब्लॉग म्हणजे -
एक website, ज्यामध्ये दररोज विविध गोष्टी टाकुन त्या एका विशिष्ट पद्धतीने प्रकाशित करणे होय. ब्लॉग हा शब्द म्हणजेच वेबलोग किंवा वेब लोग चे संक्षित्प स्वरुप. ब्लोगची मालकी, त्याचं व्यवस्थापन, आणि दैनिक प्रकाशन म्हणजेच BLOGGING. ब्लॉग मधील व्यैयक्तिक लेख अथवा स्फुटलेखन यास "Blog Post", "Post" किंवा "Entries" या शब्दानी संबोधल्या जाते. या सर्व Entries ब्लॉग मध्ये टाकणा-या व्यक्तिस BLOGGER असे संबोधल्या जाते.
Blog या संकल्पनेत TEXT (अक्षर), HYPERTEXT (विशिष्ट अक्षर), Images (चित्र) आणि links (साखळ्या) - [ज्या दुस-या कोणत्याही वेब पजेस ना, video (चलचित्र) ला, audio फाइल्स] ला link केलेल्या असतात. Blog हा एक आपल्या बोली भाषेचा आरसा आहे ज्याला आपण एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट ही म्हणु शकतो. खरेतर Blog म्हणजे (ब-याच वेळेस) व्यक्तींचा एका विशिष्ट विषयातील रस; ज्यामध्ये एक विषय घेउन त्यावर आपले होकारार्थी किंवा नकारार्थी विचार मांडणे.
मी काही Blog असेही पाहिले आहेत की ज्यामध्ये ब-याच व्यक्तीनी त्यांचे स्वत:च्या अनुभवांची चर्चा केलेली आहे.
तर, परत एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो - ब्लॉग म्हणजे काय?
गोंधळात पडलात ना? खरेतर असे काही नाही - अगदी खुपच साध प्रकरण आहे हे. मी माझ्या परीने ब्लॉग ची खालील प्रकारे व्याख्या करतो. पहा काही समजते का ते!
ब्लॉग म्हणजे एका प्रकारची website असून ज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने तुमचे कोणत्याही विषयावरचे लिखाण, अनुभव मांडलेले असतात. ज्यामधे काही वेळेपुर्वि तुम्ही टाकलेली Post अथवा article हे मुख्य पानावर सर्वात आधी येते आणि जुन्या Entries अथवा Post या शेवटी येतात.
उदाहरणासाठी माझ्या कोणत्याही ब्लाँगचे मुख्य पान पहा. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या links (साखळ्या) क्लिक करा.
01.
02.
03.
04.
चला माझ्या माहितीनुसार एव्हाना तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय हे कळुन आले असेलच (परत एकदा वरील link तपासा कारण त्यातील वैविध्य तुम्हाला नक्कीच जाणवेल).
खरेतर ब्लॉग ही एक दैनंदिनी आहे जी की साधारणपणे (अधुनमधुन) एका व्यक्तिकडून लिहिल्या जाते व update केल्या जाते. ब्लॉग हा नेहमी (कायमस्वरूपी नव्हे) एका विशिष्ट विषयावर आधारित असतो.
तुम्ही ब्लॉग लिहिण्यासाठी कोणत्याही विषयाची निवड अथवा विचार करू शकता. अगदी सांगायचेच झाले तर, फोटोग्राफी पासून ते आत्मसंशोधन, पाक क्रिया, स्वत:ची दैनंदिनी (रोजनिशी), छंद अगदी काहीही. कोणताही विषय या साठी वर्ज्य नाही. तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला असे दिसून येइल की BLOGGING म्हणजे विविध विषयावरचे प्रकार वेगवेगळ्या स्वरूपात वाचकांसमोर मांडणे.
आज जग हे ब्लॉग या संकल्पनेच्या भोवती वावरत आहे त्यामध्ये खुप अशा व्यक्ति या ब्लॉग च्या माध्यमातून एकमेकांशी वैचारिक संबंध प्रस्थापित करुन विचारांची देवाण-घेवाण करतात, आपले स्वत:च्या प्रश्न सोडवतात. ते करीत असलेल्या उद्योगधंद्यात आलेले प्रश्न सोडवतात. इथे तुम्हाला तुमच्यासारखेच देश विदेशातील समविचारी लोकांच्या भेटी होतील.
0 comments
Post a Comment